किन्नौर, 29 जुलै: हिमाचल प्रदेश (Himachal) येथील किन्नौर (Kinnaur) येथील दरड कोसळल्यानंतरचा (Landslide) एक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. या दुर्घटनेत बचावलेल्या तरुणाने हा व्हिडीओ केला आहे. या तरुणाचं नाव नवीन असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये नवीनच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. नवीनची गाडी दरडीखाली आल्यामुळे दरीत कोसळली. यानंतर मात्र नवीन पोलिसांना फोन करून मदतीचे आवाहन केलं आहे.
नवीनने याचा Live Video केला आहे. यामध्ये डोंगरावरुन दरड कोसळताना दिसत आहे. जखमी अवस्थेत नवीन आपल्या मित्रांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तो त्यांचा शोध घेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो फिरत असतानाही दगड वरुन कोसळत होते. त्यामुळे तो मित्रांना मोठ्या झाडाच्या खाली थांबण्याचं आवाहन करीत आहे. तोदेखील दरड कोसळल्यानंतर बराच वेळ मोठ्या झाडाच्या खाली उभा असल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान नवीनला त्याचा आणखी एक मित्र सापडतो. तो देखील जबर जखमी झाला आहे. दरडीमुळे दरीत गेलेली गाडी त्याला लांबपर्यंतच दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशभरात पावसाचा कहर सुरू आहे. दरम्यान अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे.
हे ही वाचा-अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!
या घटनेनंतर देशभरात दु:ख व्यक्त केलं जात होते. दरड कोसळल्यानंतर येथील चित्रच पालटलं होतं. पर्यटनासाठी आलेले नागरिक काही वेळापूर्वी निसर्गाला पाहून आनंद साजरा करीत होते. मात्र काही सेकंदात येथील वातावरणचं बदललं. या दुर्घटनेत राजस्थानातून चार जणांचा मृत्यू झाला होता. जयपूरमधील डॉक्टर दीपा शर्मा (Dr. Deepa Sharma) हिचादेखील या दुर्घटनेत मृत्यू झाला. ट्रॅव्हल्सच्या गाडीमधील 11 जणांपैकी केवळ हे दोन तरुण बचावले होते. रविवारी ही घटना घडली होती. या व्हिडीओमधून तुम्हाला तेथील परिस्थितीचा अंदाजा येईल.
कसा बचावला नवीन?
नवीन या व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार, तो ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. दरड कोसळत असल्याचे दिसताच तो तातडीने गाडीतून खाली उतरला. दरम्यान त्याच्याही डोक्यावर दरड कोसळली. मात्र कसाबसा करीत तो एका मोठ्या झाडाखाली उभा राहिला. यादरम्यान त्याला डोक्याला मारहाण झाली व रक्त वाहू लागलं. जोपर्यंत दरड कोसळण्याचं थांबत नाही, तो जागेवरच उभा राहिला. काही वेळाने तो आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Viral news, Viral photos