नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : एका महिलेनं एका वेडिंग वेन्यूवर (Wedding Venue) दीड कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. याचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल. एका आंतरराष्ट्रीय मीडिया वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, एक नवरी डान्स करतानाच फ्लोअरवर कोसळली (Bride Fall off Stage While Dancing). यामुळे तिच्या कोपराची हाडे फ्रॅक्चर झाली. यानंतर नवरीबाईनं वेडिंग वेन्यू मालकावर दीड कोटीचा खटला दाखल केला (Bride Sues Wedding Venue).
पतीच्या खिशात सापडलं असं काही की पत्नीची उडाली झोप; दुसरीसोबत करायचा हे काम
कारा डोनोवन नावाच्या या नवरीनं सांगितलं, की घसरड्या फरशीवरून पाहुणे वारंवार ड्रिंक्स घेऊन जात होते. मात्र, स्टाफ या पाहुण्यांना थांबवत नसल्यानं आणि साफसफाईकडे व्यवस्थित लक्ष न दिलं गेल्यानं ही घटना घडली. यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. या घटनेनंतर नवरीनं वेडिंग वेन्यूवर (Wedding Venue) खटला दाखल केला. डोनोवन ही एक शिक्षिका आहे.
नवरीनं असंही म्हटलं, की डान्स फ्लोअरच्या शेजारीच एक टेबलही ठेवला गेला होता. तिनं पुढे असा आरोप केला, की खाली दारू सांडलेली असतानाही ही घसरडी फरशी स्वच्छ करण्यासाठी कोणीही आलं नाही. ही घटना सप्टेंबर 2018 मध्ये घडली होती. या घटनेनंतर तीन वेळा ऑपरेशन होऊनही काराच्या वेदना कमी झालेल्या नाहीत. यामुळे ती आपल्या कामावरही परतू शकत नाही. दोन मुलांची आई असलेली कारा आपल्या या अवस्थेसाठी वेडिंग वेन्यूच्या स्टाफला जबाबदार ठरवते.
DNA टेस्ट करून आपल्या पूर्वजांचा शोध घेत होती तरुणी; Result समोर येताच हादरली
कंट्री हाउस वेडिंग्स लिमिटेडला मॅग्झीनच्या वाचकांद्वारे सर्वोत्कृष्ट वेडिंग वेन्यूच्या रुपात वोट दिलं गेलं होतं. अशात आता याच वेडिंग हाउसवर कारानं खटला दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wedding couple