मुंबई 9 ऑक्टोबर : लग्न म्हटलं की भांडणं, रुसवे-फुगवे या सगळ्या गोष्टी या येतातच. परंतू हे सगळं सोडलं तर नवरा-बायकोसाठी हा दिवस फारच म्हत्वाचा असतो, कारण या दिवसानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतू एका जोडप्यामध्ये लग्नाच्या दिवशी असं काही घडलं की पाहून तुम्हाला धक्का बसेल. या लग्न झाल्यानंतर घरी जाताना नववधू आणि नवरदेवामध्ये घडलेली ही गोष्ट कॅमेरात कैद झाली. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर देखील लोकांनी याची मजा घ्यायला सुरुवात केली आहे. हे पाहा : रात्रीच्यावेळी मेट्रोमध्ये महिला अचानक करु लागल्या अशी गोष्टी, Video पाहून बसेल धक्का सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात, जे आपलं मनोरंजन करतात. त्यात तुम्ही लग्ना संबंधी देखील अनेक मजेदार व्हिडीओ पाहिले असतील आणि हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील तसाच आहे. खरंतर हा विदाईचा व्हिडीओ आहे, लग्नानंतर नववधू आणि नवरदेव गाडीत बसून निघत असतात. या वेळी खरंतर नववधून रडणं अपेक्षीत आहे कारण ती आता तिच्या कुटुंबाला आणि जवळील व्यक्तींना मागे सोडून जात आहे. परंतू ही नववधू नसतं न करता, भलतंच काही करते. हे पाहा : Viral Video : झोमॅटो डिलिव्हरी बॉयसाठी ग्राहक औक्षणाचं ताट घेऊन उभा, तो दिसताच… ही नववधू अचानक नवरदेवावर ओरडू लागते, एवढंच काय तर त्याच्यावर हात उगारुन त्याच्या कानाखाली मारु लागते. ती एकदा-दोनदा नाही तर सतत त्या नवरदेवाला मारु लागते. हे दृश्य पाहून तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसला असेल.
व्हिडीओ पाहून असे दिसते की वधूचे असे रूप पाहून गरीब वराला कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही. हे असं का घडलं आणि नक्की नववधू ला काय झालं? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. परंतू यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा छोटा व्हिडीओ लोक वारंवार पाहात आहेत. लोक या नवरदेवाचे पुढचे दिवस आता कसे जाणार आहेत? याचाच विचार करत बसले आहेत. तर अनेक लोक या नवऱ्याची मस्करी देखील करत आहेत.