नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : सोशल मीडियावर एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉय ग्राहकाची ऑर्डर पोहोचवण्यासाठी त्याच्या घरात पोहोचला तर ग्राहकाने त्याचं जोरदार स्वागत केलं. डिलिव्हरी बॉयचं औक्षण करण्यात आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने आधी डिलिव्हरी बॉयचं औक्षण केलं. यानंतर माथ्यावर टिळा लावून त्याचं स्वागत केलं. हे सर्व पाहून डिलिव्हरी बॉय हैराण झाला. यादरम्यान ग्राहक गाणंदेखील गाऊ लागला. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे व्यक्ती आइए आपला इंतजार था..गाणं गात डिलिव्हरी बॉयचं स्वागत करीत आहे. त्यांच्या हातात पुजेचं ताट आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 25 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तब्बल 4 लाख लोकांनी हा व्हिडीओ पसंत केला आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. दिल्लीचं ट्रॅफिक, तरीही ऑर्डर आली, थॅँक्यू झोमॅटो...असं या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे. ही ऑर्डर तब्बल 1 तास उशिराने पोहोचली होती. मात्र तरीही ग्राहकाने डिलिव्हरी बॉयचे धन्यवाद मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.