मुंबई 05 ऑक्टोबर : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ आपल्या समोर येत असतात, जे पाहून आपलं मनोरंजन होतं. तर कधी आपल्यासमोर असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खूपच धक्कादायक असतात. एक मेट्रोमधील व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. अनेकवेळा मेट्रोमध्ये अशा घटना समोर येतात, ज्या पाहून लोक हादरून जातात. खरंतर भारतात मेट्रोमध्ये अनेकांनी डान्स, ऍक्टिंग संबंधीत अनेक व्हिडीओ बनवले आहेत. परंतू हा समोर आलेला व्हिडीओ अमेरिकेतील आहे. जेथे मेट्रेन प्रवासा दरम्यान अशी काही गोष्ट घडली की जी आता सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. खरंतर मेट्रोमध्ये अचानक काही महिलांची लुटारू टोळी तेथे पोहोचली. ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या टोळीने विचित्र असे हिरव्या रंगाचे सूट घातले होते, ज्यामुळे त्या कोण आहे हे सुरुवातीला लोकांना समजले नाही. निऑन जंपसूट घातलेल्या सहा महिलांच्या या टोळीने प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी प्रवाशांची लूटमार देखील केली. हे वाचा : तू तुझ्या बायकोला कधी सोडशील? ड्राइवरने विवाहित पुरुषाचं गर्लफ्रेंडसोबतचं बोलणं ऐकलं आणि मग… या महिलांनी आधी एका प्रवाशाला शिवीगाळ केली आणि नंतर दुसऱ्या प्रवाशाच्या तोंडावर वारंवार पंच मारला. यासोबतच त्यांची लूटमारही केली. न्यूयॉर्क पोस्टनुसार, महिलांच्या या गटाने दोन 19 वर्षांच्या मुलींवर हल्ला केला. त्यानंतर या महिलांनी तेथून पळ काढला. ही घटना जवळच बसलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केली. ज्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. हे वाचा : गाईला त्रास देणाऱ्या तरुणाला घडली चांगलीच अद्दल, Video पाहून म्हणाल, ‘‘याला म्हणतात कर्माचं फळ’’ पिडीतांनी या टोळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता या टोळींच्या शोधात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.