Home /News /viral /

VIDEO: लग्नाच्या स्टेजवर बसायला नव्हती जागा; नवरीने केलं असं काही की पाहुणेही एकटक बघत राहिले

VIDEO: लग्नाच्या स्टेजवर बसायला नव्हती जागा; नवरीने केलं असं काही की पाहुणेही एकटक बघत राहिले

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव स्टेजवर बसला आहे आणि त्याचे मित्रही त्याच्या शेजारी बसले आहेत. अशा स्थितीत नवरीला बसायला जागा राहिलेली नाही.

  नवी दिल्ली 29 मे : लग्नाचा सीझन सुरू होताच सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या व्हिडीओचा भरणा पाहायला मिळतो. वरात्यांचे डान्सचे व्हिडिओ असोत किंवा वधू-वरांशी संबंधित मजेदार व्हिडिओ असोत, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनेकदा असे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर नवरी नवरदेवाचे हैराण करणारे व्हिडिओही (Bride and Groom Videos) अनेकदा पाहायला मिळतात. मात्र यातील मजेशीर व्हिडिओला (Viral Wedding Video) नेटकऱ्यांची अधिक पसंती मिळते. बाबो! घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं; व्हायरल होतोय लग्नाचा हा VIDEO लग्नात वराचे मित्रही खूप उत्साही दिसतात आणि स्टेजवर ते नवरदेवाच्या जवळच राहतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव स्टेजवर बसला आहे आणि त्याचे मित्रही त्याच्या शेजारी बसले आहेत. अशा स्थितीत नवरीला बसायला जागा राहिलेली नाही. इतक्यात नववधू स्टेजवर येते आणि येताच ती थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन बसते. हे दृश्य पाहून नवरदेवाचे मित्रही नवरीकडे एकटक बघतच राहतात.
  याआधी तुम्ही कदाचितच असा व्हिडिओ पाहिला असेल. कारण लग्नाच्या दिवशी सहसा नवरी लाजताना दिसते मात्र या व्हिडिओमधील नवरीबाई अगदी बोल्ड आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर dulhaniyaa नावाच्या अकाऊंटवरुन मागील वर्षी शेअर करण्यात आला होता. मात्र, तो अजूनही लोकांचं मन जिंकत आहे. कधीही पाहिलं नसेल असं लग्न; फुलांचे हार नाही, तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले खतरनाक साप, VIDEO यावर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने नवरीच्या या कृत्याला तमाशा म्हटलं आहे, तर दुसऱ्याने नवरीचं हे पाऊल असाधारण असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, 'याला म्हणतात पावर'. एकंदरीतच हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्कही झाले आहेत आणि खळखळून हसतही आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bride, Wedding video

  पुढील बातम्या