Home /News /viral /

कधीही पाहिलं नसेल असं लग्न; फुलांचे हार नाही, तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले खतरनाक साप, VIDEO

कधीही पाहिलं नसेल असं लग्न; फुलांचे हार नाही, तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले खतरनाक साप, VIDEO

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

व्हिडिओमध्ये (Snake Video) तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव फुलांच्या हाराऐवजी एकमेकांच्या गळ्यात खतरनाक साप टाकतात. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत

  नवी दिल्ली 28 मे : सध्या भारतात लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सतत लग्नातील नवनवे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. आपण सर्वांनी पाहिलं असेल की लग्नात वरमाळेचा कार्यक्रमही होतो. यात नवरी आणि नवरदेव एकमेकांनी फुलांचे हार घालतात. मात्र, आता एका अतिशय विचित्र वरमाळेच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ (Viral Wedding Video) समोर आला आहे. यात नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या हाराच्या जागी असं काही घालतात, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. VIDEO: मनाविरुद्ध लग्न लावल्याचा राग? नवरीने नवरदेवासोबत स्टेजवरच केलं असं काही की सगळेच शॉक व्हिडिओमध्ये (Snake Video) तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव फुलांच्या हाराऐवजी एकमेकांच्या गळ्यात खतरनाक साप टाकतात. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही घटना नेमकी कुठली आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की मोकळ्या मैदानात एक लग्न सुरू आहे. यादरम्यान नवरी नवरदेवाच्या वरमाळेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भरपूर लोक जमलेले आहेत. इतक्यात वरमाळेच्या या कार्यक्रमात एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता की नवरी आपल्या हातात एक खतरनाक साप घेऊन येते. यानंतर नवरीबाई फुलांच्या हाराऐवजी आपल्या नवरदेवाच्या गळ्यात हा साप घालते. इतकंच नाही तर यानंतर नवरदेवही आपल्या नवरीच्या गळ्यात एक भलामोठा अजगर टाकतो. अर्रsss! नवरीबाईला वरमाला घालताच निसटली नवरदेवाची पँट; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO नवरी आणि नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात साप घातल्यानंतर वरमाळेचा हा कार्यक्रम पूर्ण होतो. या व्हिडिओमध्ये वरमाळेचा कार्यक्रम ज्या पद्धतीने पार पडतो, तसा कदाचित याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल. हा व्हिडिओ पाहून सगळेच शॉक झाले आहेत. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ psycho_biharii नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Snake video, Wedding video

  पुढील बातम्या