Home /News /viral /

बाबो! घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं; व्हायरल होतोय लग्नाचा हा VIDEO

बाबो! घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं; व्हायरल होतोय लग्नाचा हा VIDEO

घोड्यावर नवरदेवाची वरात तुम्ही पाहिली असेल पण कधी घोड्यासकट नवरदेवाला उचललं पाहिलं आहे का?

  मुंबई, 29 मे :  लग्नाच्या वरातीत तुम्ही पाहिलं असेल नवरदेवाचा उत्साह इतका असतो की तोसुद्धा नाचताना दिसतो (Wedding video viral). कधी मित्रांसोबत तर कधी घोड्यावर बसल्या बसल्या नाचतो. नवरदेवापेक्षा उत्साही तर त्याचे मित्र असतात (Groom video viral). जे त्याला खांद्यावर घेऊन नाचतात. पण सध्या सोशल मीडियावर लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात नवरदेवाला घोड्यासकटच उचलण्यात आलं आहे (Groom lifted with horse and cot). लग्न म्हटलं की नवरदेवासह घोडा आलाच. याच घोड्यावरून वाजतगाजत नवरदेवाची वरात निघते. नवरदेव घोड्यावर बसून आपल्या नवरीला आणायला जातो. पण घोड्यासह नवरदेवाला उचललं तुम्ही याआधी कदाचित कधीच पाहिलं नसेल. त्यामुळेच या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाची ही अनोखी वरात चांगलीच चर्चेत आली आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरदेव मध्ये घोड्यावर बसलेला दिसतो आहे. त्याच्या आजूबाजूला त्याचे मित्र, नातेवाईक आहेत. सर्वजण मिळून घोडा आणि नवरदेव दोघांनीही उचलतात आणि गरागरा गोल फिरवतात. आश्चर्य म्हणजे असं करताना घोडाही शांत उभा राहिला आहे. गोल फिरवल्यानंतर तोसुद्धा जागचा हलत नाही. अगदी एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध उभा राहतो आणि त्यामुळेच त्याच्यावर असलेला नवरदेवही शांत बसला आहे. हे वाचा - कधीही पाहिलं नसेल असं लग्न; फुलांचे हार नाही, तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले खतरनाक साप, VIDEO आता नवरदेवाला उचलणं ठिक आहे पण घोड्यासकट उचलणं म्हणजे आश्चर्यच नाही का? एखाद्या घोड्याचं वजन किती असेल याचा अंदाजा तर तुम्ही लावूच शकता.
  व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल घोड्याखाली एक खाट ठेवण्यात आली आहे. आधी या घोड्याला या खाटीवर उभं केलं आहे. त्यानंतर या घोड्यावर नवरदेव बसला आहे आणि मग सर्वांनी खाटीला सर्व बाजूंनी धरून उचललं आणि ही खाट गोल फिरवली. हे वाचा - बायकोसोबत Wedding Photo पाहताना बसला धक्का; Honeymoon सोडून नवऱ्याने काढला पळ व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. नेमकं हे चाललं तरी काय आहे समजत नाही आहे? लग्नाची ही अशी कोणती परंपरा आहे आणि कुठली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला किंवा या प्रथेबाबत तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या