Crocodile On Road In Karnataka: कर्नाटकातील कोलाजमध्ये एक अनोखा मात्र अनपेक्षित पर्यटक फिरत असल्याचं पाहण्यात आलं आहे. ही पर्यटक आहे एक भली मोठी मगर, जी आपल्या निवासस्थानी जाण्यापूर्वी गावात फिरताना दिसली. बाहेर आल्यानंतर ती गावभर फिरली, दमली म्हणून एके ठिकाणी आराम केला. मग पुन्हा तिची शतपावली सुरू झाली. काही वेळानंतर तिला रेस्क्यू करून नदीत सोडण्यात आलं आहे. या घटनेमुळे नागरिकांना भयभीत करून सोडलं आहे. आता आली म्हणजे मगर पुन्हा येऊ शकते, अशी शंका निर्माण झाली आहे. एका वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी घाट परिसरात मुसळधार पावसामुळे नद्यांचं पाणी किनाऱ्यापर्यंत आलं आहे. त्यामुळे काळी नदीचा देखील समावेश आहे. काळी नदी कर्नाटकच्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात मगरींचं वास्तव आहे. यापैकी अनेक कन्नड जिल्ह्यातील दांदेली येथील पर्यटनाच्या ठिकाणीही सापडतात. गावात मगर दिसल्यानंतर स्थानिक पुरते घाबरले होते. पहिल्यांदाच अशा प्रकारे मगर रस्त्यांवर फिरताना पाहून लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. हे ही वाचा- मामी-भाच्यानंतर आता सासू-जावयाने बांधली लग्नगाठ; 10 महिन्यांपासून होते फरार
#WATCH Karnataka | A crocodile found strolling through Kogilban village in Dandeli. Later, forest officials rescued the crocodile & released it into the river. pic.twitter.com/2DDk7JuOB8
— ANI (@ANI) July 1, 2021
कोलाज काळी नदीच्या तटावर स्थित आहे. मात्र पहिल्यांदाच मगरीला गावात फिरत असल्याचं पाहण्यात आलं आहे. दांदेलीमध्ये अभयारण्य असून हा परिसर जंगलाने व्यापलेला आहे. येथे मोठ्या प्रमाणात वनस्पती पाहायला मिळतात. येथे मगर ही प्रमुख वन्यजीव आकर्षण आहे. येथे बर्ड वॉचिंगदेखील केली जाते. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात मगरी असल्या कारणाने क्रोकोडाइल पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.