ChameleonVideo: सरडा रंग बदल्यासाठी ओळखला जातो. सरड्याचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 2 मिनिटात सरड्याने 7 वेळा रंग बदलले आहेत. निसर्गाच्या या सौंदर्याला जवळून पाहिल्यामुळे लोक दंग झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक सरडा (Chameleon) रंग बदलताना दिसत आहेत. IPS रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, सरड्याला रंग बदलताना पाहिलं आहे का? (The Chameleon changed color 7 times in just 2 minutes The beauty of nature is captured on camera) हे ही वाचा- आनंद महिंद्रांनी तरुणांना सांगितली महत्त्वाची बिजनेस ट्रिक; VIDEO VIRAL
Ever seen a #chameleon change its colours?
— Rupin Sharma IPS (@rupin1992) June 30, 2021
Watch beautifully shot video by #VikramPonappa of #Bengaluru, - chameleon change its colours seven times!
Please watch in full screen.@susantananda3 @ParveenKaswan @SudhaRamenIFS pic.twitter.com/JHY6fSBUCd
विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहताना पूर्ण स्क्रिन करण्याची विनंती आयपीएस अधिकाऱ्यांनी केली आहे. सराडा अत्यंत शांतपणे आपले रंग बदलतो. हा व्हिडीओ बंगळुरूच्या विक्रम पोनप्पा यांनी शूट केला आहे. विक्रम पोनप्पा हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. आणि ते अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. सरड्याचा रंग बदलणारा हा व्हिडीओ लोक खूप पसंत करीत आहे. हा व्हिडीओ पाहताना निसर्गांचं सौंदर्य पाहायला मिळतं. विशेष म्हणजे सरड्याचे रंग अगदी ठळकपणे पाहायला मिळतात.