नवी दिल्ली 29 ऑगस्ट : प्रत्येकासाठीच आपल्या लग्नाचा (Marriage) दिवस अतिशय खास असतो आणि प्रत्येकजण प्रयत्न करतो की हा दिवस आणखी खास बनावा. यासाठी लग्नाच्या भरपूर दिवस आधीच तयारीही सुरू होते. पाहुण्यांची लिस्टही बनते. स्पेशल डिशचं (Special Dish) सिलेक्शनही होतं आणि अशा बऱ्याच गोष्टींची तयार होते. मात्र, इतकं सगळं करूनही जर पाहुणे पार्टीमध्ये (Reception Party) आले नाहीतर तर तुमच्या या सर्व मेहनतीवर पाणी फेरलं जातं. अशाच एक घटनेत नवरीनं (Bride) थेट पाहुण्यांनाच 17 हजार रुपयांचं बिल (Bill) पाठवलं आहे. द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना यूनायटेड किंगडममधील आहे. यात एका नवरीनं आपल्या लग्नासाठी अगदी खास तयारी केली. नवरीनं प्रत्येक २ पाहुण्यांसाठी 17 हजार रुपये खर्चून त्यांच्यासाठी रिसेप्शन डिनरचं आयोजन आणि इतरही गोष्टींची व्यवस्था केली. मात्र, निमंत्रण देऊनही पाहुणे रिस्पेशन पार्टीमध्ये न पोहोचल्यानं नवरीनं या वाया गेलेल्या गोष्टींचे पैसे वसूल करण्यासाठी थेट पाहुण्यांच्याच घरी बिल पाठवलं. सोशल मीडिया साईट Reddit वर आता या बिलाची कॉपी चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकजण यावर मजेशीर कमेंट करत आहेत.
VIDEO: दिमाखात करत होता स्टंट; युवकासोबत घडलं असं काही ज्याची कल्पनाही केली नसेल
व्हायरल होणाऱ्या इनव्हॉईस कॉपीमध्ये लिहिलं आहे, की ‘No call, No show Guest.’ यासोबतच असंही लिहिलं गेलं आहे, की या व्यक्तींनी रिसेप्शन डिनरमध्ये हजेरी लावली नाही आणि दोन सीट रिकामे राहिले. यामुळे पाहुण्यांना हे बिल पाठवलं जात आहे. यासोबतच इनव्हॉईसच्या नोट्स सेक्शनमध्ये लिहिलं गेलं, की हे बिल तुम्हाला भरावं लागेल कारण तुम्ही आम्हाला आधी हे सांगितलं नव्हतं की तुम्ही पार्टीला येणार नाही. त्यामुळे हे बिल तुम्हाला लवकरात लवकर जमा कराव लागेल. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. कृपया आमच्यासोबत संपर्क साधा आणि सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीनं हे बिल भरणार आहात.
VIDEO: भिंत पाडायला गेला अन् पाय मोडून घेतला; अक्षरशः वेदनेनं विव्हळू लागला युवक
हा घटना रेडिटवर व्हायरल झाल्यानंतर एका यूजरनं नवरीचं हे कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. यूजरनं लिहिलं, की लग्नाचं निमंत्रण स्वीकारणं हे काही कायदेशीर बाब नाही. हे एक सामाजिक नातं जपण्याचं काम आहे मात्र कोरोनामुळे लग्नात सहभागी होणं प्रत्येकाला शक्य नाही. तर काहींनी नवरीची साथ देत कोणतीही सूचना न देता वेळेवर लग्नात न येणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.