Home /News /viral /

पप्पा, मला टॉर्चर करणं बंद करा! प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांना लेकीचा संदेश, VIDEO VIRAL

पप्पा, मला टॉर्चर करणं बंद करा! प्रेमाला विरोध करणाऱ्या वडिलांना लेकीचा संदेश, VIDEO VIRAL

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आपल्या प्रियकरासोबत (Girl marries her boyfriend and appeals for help through video) लग्न करणाऱ्या तरुणीनं वडिलांना संदेश देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

    पटना, 20 सप्टेंबर : घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आपल्या प्रियकरासोबत (Girl marries her boyfriend and appeals for help through video) लग्न करणाऱ्या तरुणीनं वडिलांना संदेश देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. पप्पा, मला आणि माझ्या पतीला त्रास देऊ नका, अशी विनंती (Girl requested to let her live with husband) करतानाच वडिलांच्या ओळखीतले खासदार त्यांच्या राजकीय शक्तीचा (Political power) वापर करून आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही या तरुणीने केला आहे. काय आहे प्रकरण? बिहारच्या हनुमानगढमध्ये राहणाऱ्या कनिका सोनी या तरुणीनं वैशालीमध्ये राहणाऱ्या लक्की नावाच्या जिम ट्रेनरसोबत प्रेमविवाह केला. दोघांनी घरातून पळून जात कोर्ट मॅरेज केलं. या लग्नाला कनिकाच्या कुटुंबीयांचा कडाडून विरोध आहे. आपल्या वडिलांचा राजकीय क्षेत्रात दबदबा असून भाजप खासदार निहालचंद मेघवाल हे आपले भाऊ असल्याचा दावा कनिकानं या व्हिडिओत केला आहे. वडिल आणि मेघवाल आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लावत असल्याचं तिनं व्हिडिओत म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पोलिसांपासून वाचत आणि लपत असून काही दिवसांपासून काहीही खाल्लं नसल्याचं तिनं या व्हिडिओत म्हटलं आहे. आपल्याला लक्कीसोबत सेटल होण्याची इच्छा असून त्रास देणं बंद करावं, असं आवाहन तिनं या व्हिडिओतून केलं आहे. मात्र भाजप खासदार मेघवाल यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. या तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना आपण ओखळत नसून आपलं नाव यात आल्यामुळे आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे वाचा - भयंकर! पहिल्या मजल्यावरून आईला दिला धक्का, डोकं फुटून झाला मृत्यू पोलीस तपासातून ट्विस्ट दरम्यान, पोलीस एका अपहरणाच्या प्रकरणात चौकशी करताना कनिकाकडे पोहोचले होते. त्यावेळी तिने आपण खासदार मेघवाल यांनी बहीण असल्याचा दावा केला होता. पोलिसांनी हा दावा पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला आणि सत्य बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरु  केल्या. त्यानंतर तरुणीनं हा व्हिडिओ अपलोड करत मदतीची याचना केली आहे. हा व्हिडिओ सध्यासोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Marriage, Viral video.

    पुढील बातम्या