• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बाबो! विराटची लाडकी कार लंबोर्गिनी गॅलार्डो स्पायडर विकली जाणार; किंमत बघून तुम्हीही व्हाल थक्क

बाबो! विराटची लाडकी कार लंबोर्गिनी गॅलार्डो स्पायडर विकली जाणार; किंमत बघून तुम्हीही व्हाल थक्क

विराटच्या ताफ्यातली अशीच एक अत्यंत महागडी कार आता विकली जाणार आहे.

 • Share this:
  उत्तम क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीचं (Virat Kohli) जगभरात नाव आहे. त्यासोबतच त्याचं नाव आणखी एका गोष्टीसाठी घेतलं जातं, ते म्हणजे त्याचा कार्सचा (Virat kohli Premium Cars) छंद. विराटकडे एकाहून एक सरस अशा महागड्या कार्स (Virat Kohli's car collection) आहेत. त्यात ऑडी (Audi), बीएमडब्ल्यूपासून (BMW) अनेक मोठ्या कंपन्यांच्या कार्सचा समावेश आहे. विराटच्या ताफ्यातली अशीच एक अत्यंत महागडी कार आता विकली जाणार आहे. त्या कारचं नाव आहे लंबोर्गिनी गॅलार्डो स्पायडर (Lamborghini Gallardo Spyder). विराटने 2015 साली नारिंगी रंगाची ही कार खरेदी केली होती आणि नंतर काही महिनेच वापरली होती. या कारची किंमत सध्या तब्बल 1.35 कोटी रुपये एवढी आहे. हे वाचा - PhonePe युजर्सला झटका! आता वॉलेटमधून Online Transaction करणं महागणार ही कार केवळ चार सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर एवढा स्पीड प्राप्त करू शकते. या कारचा सर्वोच्च स्पीड ताशी 324 किलोमीटर एवढा आहे. या कारमध्ये 5.2 लिटरचं V10 इंजिन असून, त्यामुळे कारला जबरदस्त शक्ती मिळते. लंबोर्गिनी या इटालियन कंपनीचं शेवटचं गॅलार्डो मॉडेल 2015 साली बाजारात दाखल झालं होतं. विराटने काही महिने वापरल्यानंतर ती कार विकली होती. ही कार पुन्हा विक्रीसाठी तयार असल्याच्या वृत्ताला कोचीच्या रॉयल ड्राइव्ह (Royal Drive) या कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरने दुजोरा दिला. ही कार केवळ 10 हजार किलोमीटर्सच चालली आहे. कोचीच्या मार्केटिंग मॅनेजरने सांगितलं, की रॉयल ड्राइव्हने जानेवारी 2021 या महिन्यात कोलकात्यातल्या एका प्रीमियम आणि लक्झरी प्री-ओन्ड कार डीलरकडून  ही कार खरेदी केली होती. लंबोर्गिनीचं ते 2013 सालचं मॉडेल असून, विराटने काही कालावधीसाठी ती कार वापरली होती. ती केवळ 10 हजार किलोमीटर्स चालली आहे. हे वाचा - T20 आणि IPL नंतर विराट कोहली वन-डे टीमची कॅप्टनसीही सोडणार? विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी-20 क्रिकेटचं कॅप्टनपद सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी त्याने ताणाचं कारण दिलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धेतल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या टीमचं कॅप्टनपदही सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सध्या विराट बराच चर्चेत आहे. आजपासून यंदाच्या आयपीएलचा दुसरा सीझन सुरू होत असून, त्यात विराटच्या नावावर एक खास विक्रम जमा होणार आहे. एकाच फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये 200 मॅचेस खेळणारा तो पहिला खेळाडू बनणार आहे.
  First published: