मुंबई, 23 ऑगस्ट : लग्नात (Wedding video) नवरीचं (Bride video) नटणं, मुरडणं, लाजणं आणि नाचणंही तुम्ही पाहिलं असेल. पण सध्या एका भडकलेल्या नवरीचा (Angry bride) व्हिडीओ चर्चेत आहे. ऐन लग्नात नवरी संतप्त (Bride angry on wedding) झाली आहे. तिला इतका राग आला की त्यानंतर ती नवरदेवाजवळ (Bride angry on entry) जायलाच तयार नाही.
एका अँग्री ब्राइडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. तिच्या रागाचं कारण तुम्हाला समजलं तर सुरुवातीला हसू येईल पण जर तुम्ही तिच्या जागी राहून पाहिलं तर नक्कीच तिने जे केलं ते बरोबरच केलं असंच तुम्हाला वाटेल.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता नवरीला तिची माहेरची मंडळी स्टेजवर असलेल्या नवरदेवाकडे घेऊन जात असतात. पण नवरी मध्येच थांबते आणि तिचा चेहरा रागाने लाल झालेला दिसतो. तिच्या रागाचं कारण म्हणजे एक गाणं.
हे वाचा - नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा ताबा! लग्नमंडप सोडून रस्त्यावर आली...; VIDEO पाहा
एंट्री घेताना तिने सांगितलेलं तिच्या आवडीचं गाणं न लावल्याने ती नाराज झाली आहे. व्हिडीओत तुम्ही ऐकाल तर नवरी बोलते मी बोलेल होते माझं गाणं लावला. मेरा पीया घर आया लावायला मी सांगितलं होतं. लग्नाच्या खास दिवशी आपली जशी एंट्री ठरवली होती तशी झाली नाही, म्हणूनच नवरीचा चेहरा पडला. नवरीसोबत असलेल्या तिच्या बहिणी, मैत्रिणी आणि इतर लोक तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. तू सांगितलेलंच गाणं लावणार असं सांगतात. पण नवरीचा मूड पूर्णपणे खराब झालेला दिसतो आहे. ती इतकी चिडली आहे की पुढे जायलाच तयार नाही.
हे वाचा - नवरीनं लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवाला रडवलं; व्हायरल होतोय Wedding Video
साहजिकच नवरा आणि नवरी दोघांसाठीही लग्नाचा दिवस विशेष असतो. त्यासाठी किती तरी महिन्यांपासून ते लोक तयारी करत असतात. त्यात असा घोळ झाला तर राग येणारच नाही का? theweddingbrigade इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी या नवरीला नेमकं काय वाटतं हे ते समजून तिची बाजू घेतली आहे. तर काही जणांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिला आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video