• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण

लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण

नवरदेवानं (Groom) हे लग्न करण्यासाठी 90 हजार रुपये दिले होते. मात्र, लग्नानंतर पहिल्याच दिवशी घराच्या छतावरुन उडी घेत नवरी (Bride) परार झाल्यानं नवरदेवाला धक्काच बसला

 • Share this:
  भोपाळ 30 जुलै: एक नवरी लग्नाच्या (Marriage) पहिल्याच रात्री घरातून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. नवरदेवानं (Groom) हे लग्न करण्यासाठी 90 हजार रुपये दिले होते. मात्र, लग्नानंतर पहिल्याच दिवशी घराच्या छतावरुन उडी घेत नवरी (Bride) परार झाल्यानं नवरदेवानं पोलीस (Police) ठाण्यात धाव घेत पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) गोरमी परिसरातील आहे. गोरमी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेत चौकशी केली आहे. 'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का? अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार मिळालेल्या माहितीनुसार, गोरमी परिसरात राहणाऱ्या दिव्यांग सोनू जैन याचं लग्न होत नव्हतं. सोनूच्या ओळखीच्या ग्वालियर येथील उदल खटीक यानं सोनूला म्हटलं, की तो सोनूचं लग्न जमवेल मात्र याच्या बदल्यात एक लाख रुपये द्यावे लागतील. सोनूनं 90 हजारात त्याच्यासोबत व्यवहार केला. मंगळवारी उदल खटीक अनिता रत्नाकार नावाच्या एका महिलेला घेऊन गोरमी येथे आला. सोबतच तो अरूण खटीक आणि जितेंद्र रत्नाकर यांनाही घेऊन आला. याशिवाय आणखी एक व्यक्तीही त्यांच्यासोबत होता. फोटोशूट करतानाच नवरीनं धक्का देत नवरदेवाला पाण्यात ढकललं अन्...; पाहा VIDEO घरातील काही सदस्यांच्या उपस्थितीत सोनू जैन याचं लग्न अनितासोबत झालं. मंगळसूत्र घालून सात फेरेही घेतले गेले. सोनूच्या कुटुंबीयांनी जोडप्याला आशिर्वादही दिला. यानंतर रात्री सर्वजण झोपण्यासाठी गेले. अनिताच्या सोबत आलेले जितेंद्र रत्नाकर आणि अरूण खटीक हे दोघंही बाहेर झोपण्यासाठी जात असल्याच्या बहाण्यानं रूममध्ये बाहेर पडले. तर, अनितानंही तब्येतीचं कारण देत छतावर जाऊन नंतर तिथून पळ काढला.
  Published by:Kiran Pharate
  First published: