मुंबई 27 डिसेंबर : सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओंची काही कमी नाही. इथे आपल्याला माहिती देणारे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा कसा वेळ निघून जातो. हे त्यांचं त्यांना कळत नाही. कारण इथे त्यांना आपल्या आवडीचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला खूपच भारी वाटेल. हे ही पाहा : बिबट्याच्या समोर उभी होती गाय, पण रात्रीच्या अंधार असं काही घडलं की… Video Viral हा व्हिडीओ एका नववधूचा आहे. आता सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया ओपन जरी केलं तरी तुम्हाला 10 मधील 1 व्हिडीओतरी कोणाच्या ना कोणाच्या लग्नाचाच दिसेल. हे व्हिडीओ कधी लग्नातील एखाद्या सुंदर क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. या समोर आलेल्या व्हिडीओमधील नववधू खरंच तुमचं हृदय जिंकून घेईल. हो कारण ही नववधू आपल्या लग्नात बॅन्ड वाजवत आहे, तो ही अगदी तालात.
हो तुम्हाला हे ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण हे खरं आहे. जिथे आजकाल नववधून गाण्याचा ठेका धरत लग्नात एन्ट्री करताना दिसते, तिथे ही नववधू मात्र आपल्याच लग्नात बॅन्ड वाजवताना दिसत आहे. साउथ इंडियन स्टाईल एक म्यूजीक वाजवलं जात आहे. ज्यावर नववधू देखील वाजवत आहे. हे गाणं किंवा तो ताल असाही ऐकून सर्वांना ताल धरायला लावत आहेत. त्यात नववधूला असं वाजवताना पाहून तर अनेकांना फारच भारी वाटतंय. नववधू देखील अगदी स्वॅगमध्ये बॅन्ड वाजवताना दिसत आहे.
या व्हिडओला नेटकऱ्यांकडून खूपच पसंत केलं जात आहे. एका युजरने मजेदारपणे म्हटलं आहे की, ही नवरदेवासाठी चेतावनी असू शकते की त्याची देखील अशीच बँड वाजणार आहे.