जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका लग्नाची अजब कहाणी; घोडा, कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण...

एका लग्नाची अजब कहाणी; घोडा, कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ना घोडी चढला, ना कारमध्ये बसला तर चक्क अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचवर वरात घेऊन आला. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होते आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उदयपूर, 03 मार्च : सामान्यपणे नवरदेव वाजतगाजत वरात घेऊन आपल्या नवरीला न्यायला येतो. एकतर तो घोडीवर बसून येतो किंवा कारमधून. पण एक नवरदेव मात्र ना घोडी चढला, ना कारमध्ये बसला तर चक्क अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचवर वरात घेऊन आला. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होते आहे. मंगळवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिंधी समाजामार्फत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात राहुल कटारिया आणि रितिका नत्थानी या जोडप्याचंही लग्न होणार होतं. लग्नाच्या पाच दिवस आधी राहुल काही कामानिमित्त अहमदाबादला गेला होता. घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. कुटुंबाला त्याच्या अपघाताची माहिती मिळाली. ते त्याला उदयपूरला घेऊन आले. पण पुन्हा ऑपरेशनसाठी त्याला अहमदाबादला न्यावं लागलं. राहुलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या त्याच्या पायात रॉड टाकण्यात आली. पायाल प्लॅस्टर लावण्यात आलं. ज्यामुळे त्याला चालणं शक्य होत नव्हतं.  डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सुरुवातीला त्याने लग्न टाळण्याचा विचार केला. हे वाचा -  बापरे! आधी पळव पळव पळवलं नंतर जमिनीवर आपटलं; एका कोंबड्याने तरुणीचे केले हाल पण नंतर दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. नवरी रितिकानेही आपल्या सामूहिक विवाहस्थळी रितीरिवाजाप्रमाणे विधीवत लग्न व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर नवरीच्या इच्छेसाठी आणि कुटुंब पाठीशी असल्याने राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं. अपघातात तो गंभीर जखमी झाला. पण तरी विवाह मुहूर्त त्याने चुकू दिला नाही. अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचवर तो विवाहस्थळी पोहोचला. सिंधी समाजाच्या सेंट्रल युवा समितीच्या सदस्यांनी अॅम्ब्युलन्सह आवश्यक ती व्यस्था केली.  रितिकासोबत त्याने 7 फेरे घेतले आणि लग्नबंधनात अडकला. हे वाचा -  मिझोराममधील या Viral Photo चं जगभरात होतंय कौतुक; यात असं नेमकं काय आहे? झी न्यूज हिंदी च्या रिपोर्टनुसार या नवरदेवाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सिंधी समाजाच्या झुलेलाल सेवा समितीमार्फत 25 वा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सोहळ्यात एकूण 6 जोडप्यांचं लग्न होणार होतं. त्यापैकी 2 नवरदेवांचा अपघात झाला. त्यापैकी राहुल विवाहस्थळी आला, दुसरा नवरदेव मात्र तिथं पोहोचला नाही. त्यामुळे 5 जणांनी लग्नगाठ बांधली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात