जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; वरातीत Pushpa च्या Srivalli वर नाचून नाचून वऱ्हाड्यांचे हाल

VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; वरातीत Pushpa च्या Srivalli वर नाचून नाचून वऱ्हाड्यांचे हाल

VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; वरातीत Pushpa च्या Srivalli वर नाचून नाचून वऱ्हाड्यांचे हाल

लग्नाच्या वरातीत तरुणांनी पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर सिग्नेचर स्टेप केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च : वरात म्हटलं की लोक मनसोक्त कसेही जाणतात. पण सध्या सर्वांवर पुष्पा  (Pushpa) फिल्ममधील श्रीवल्ली गाण्याचा (Srivalli Song) फिव्हर चढला आहे. जो तो या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसतो आहे. अगदी लग्नाच्या वरातीत नाचणारे वऱ्हाडीही याला अपवाद ठरले नाही. एरवी गणपती डान्स करताना दिसणाऱ्या वऱ्हाड्यांनी श्रीवल्ली गाण्यावर नाच केला आणि नाचता नाचता त्यांचे अक्षरशः हाल झाले (Baarat srivalli dance). श्रीवल्ली गाण्यावरील डान्सचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. जे पाहून तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही. तुम्ही इतकं हसाल इतकं हसाल की तुमच्या पोटात दुखेल पण हसणं थांबणार नाही. व्हिडीओत पाहू शकता काही तरुण लग्नाच्या वरातीत आहेत. मागे श्रीवल्ली गाणं ऐकू येत आहे आणि सर्वजण या गाण्यावर एकत्र नाचत आहे. प्रत्येक जण या गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या या फिल्ममधील त्याची डान्स स्टेप कॉपी करताना दिसत आहेत. हे वाचा -  एका लग्नाची अजब कहाणी; घोडा-कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण… या गाण्यावर नाच करून काही तरुणांचे हालही झाल्याचं दिसत आहे. कुणाची मानच लचकली, कुणाची कंबर वाकडी झाली, कुणाचे पाय दुखू लागले. हे सर्वकाही त्यांच्या एकंदर वागण्यावरून, हावभावावरून दिसून येतं.

जाहिरात

पण तरी त्यांच्यावरील पुष्पा फिव्हर काही उतरला नाही. या अवस्थेतही त्यांनी आपला डान्स सुरू ठेवला आहे. नॉनस्टॉप ते एकच स्टेप करत आहेत. @Shivaji_Dube ट्विटर अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात