जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Exclusive : लग्नमंडपातील गोळीबारात नववधूला लागली गोळी; मन सुन्न करणारा LIVE VIDEO

Exclusive : लग्नमंडपातील गोळीबारात नववधूला लागली गोळी; मन सुन्न करणारा LIVE VIDEO

Exclusive : लग्नमंडपातील गोळीबारात नववधूला लागली गोळी; मन सुन्न करणारा LIVE VIDEO

घटनेत लग्नसमारंभात करण्यात आलेल्या हर्ष फायरींगमध्ये (Harsh Firing In Wedding) नवरी (Bride) जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video Viral) समोर आला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटणा 17 जुलै : लग्नसमारंभांमधील (Marriage Function) अनेक मजेशीर किंवा हैराण करणारे व्हिडिओ दररोज समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेला व्हिडिओ हा केवळ हैराण करणारा नाही तर धक्कादायक आहे. या घटनेत लग्नसमारंभात करण्यात आलेल्या हर्ष फायरींगमध्ये (Harsh Firing In Wedding) नवरी (Bride) जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video Viral) समोर आला आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) प्रतापगंजमधील गोविंदपूर गावातील आहे. कारची दुचाकीला धडक; घटनेत जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू; भीषण अपघाताचा VIDEO या धक्कादायक घटनेचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलेला आहे. या घटनेनंतर नवरीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचारा सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार किंवा माहिती दिली गेली नाही. मात्र, या घटनेनं लग्नमंडपात एकच खळबळ उडाली.

जाहिरात

माहेरी जाऊन पत्नीनं बांधली दुसऱ्याच सोबत लग्नगाठ; पहिल्या पतीनं केली अजब मागणी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की लग्नमंडपात दोन जोडप्यांचा विवाहसोहळा संपन्न होत आहे. नवरी आणि नवरदेवानं हातामध्ये वरमाळा घेतली आहे. माईकवर एक व्यक्ती बोलत आहे. तर, स्टेजच्या खाली जवळच उभा असलेला एक व्यक्ती हातात पिस्तुल घेऊन उभा आहे. बराच वेळ तो तिथेच उभा आहे. नवरीदेखील त्याच्याकडे पाहत आहे. इतक्यात त्याच्या हातून गोळी झाडली जाते आणि ही गोळी नवरीला लागते. गोळी लागताच ही नवरी खाली कोसळते. या घटनेनंतर मंडपात एकच गोंधळ उडतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात