मराठी बातम्या /बातम्या /Viral /माहेरी जाऊन पत्नीनं बांधली दुसऱ्याच सोबत लग्नगाठ; धरणे आंदोलनाला बसला पहिला पती, केली अजब मागणी

माहेरी जाऊन पत्नीनं बांधली दुसऱ्याच सोबत लग्नगाठ; धरणे आंदोलनाला बसला पहिला पती, केली अजब मागणी

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

आपल्या मुलीच्या लग्नात, नवरामुलगाच पळून गेल्याच समजताचं, वधूकडील मंडळींकडे परिस्थिती गंभीर झाली होती, आपल्या मुलीचं लग्न मोडल्याचं त्यांना अतिशय दु:ख झालं.

एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एक व्यक्ती आपल्या पत्नीला (Wife) परत मिळवण्यासाठी धरणे आंदोलनाला बसला आहे.

बंगळुरू 17 जुलै : एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एक व्यक्ती आपल्या पत्नीला (Wife) परत मिळवण्यासाठी धरणे आंदोलनाला बसला आहे. मात्र, त्याच्या पत्नीनं दुसरं लग्न (Marriage) केलं आहे. त्यामुळे, आता तिला पहिल्या पतीसोबत जायचं नाही. घरगुती वादांमुळे या महिलेनं आपल्या पहिल्या पतीचं घर सोडलं होतं. ही घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) बर्दवान जिल्ह्यातील आहे.

आजोबा रॉक्स बाकी शॉक! नाचता नाचता हवेतच उडू लागले, डान्स फ्लोअरवर लावली आग

बर्दवानच्या रामचंद्र कॉलनीत राहाणाऱ्या एका युवतीचं लग्न दोन वर्षांआधी शाम (बदलेलं नाव) या युवकासोबत झालं होतं. या दोघांनी प्रेमविवाह (Love Marriage) केला होता. मात्र, लग्नानंतर तीन महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागले. घरात रोज भांडण होत असे. हा वाद इतका वाढला की शामची पत्नी सासर सोडून आपल्या माहेरी परतली आणि परत आलीच नाही.

शामचा असा आरोप आहे, की तो आपल्या पत्नीला परत आणण्यासाठीही गेला होता. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी त्याला मारहाण करत तिथून परत पाठवलं. त्यामुळे तो आपल्या पत्नीच्या घरीही गेला नाही. काही दिवसांपूर्वीच त्याला आपल्या पत्नीनं दुसरं लग्न केलं असल्याची माहिती मिळाली. हे कळताच शाम आपल्या पत्नीच्या नव्या सासरी गेला आणि धरणे आंदोलनाला बसला.

आजोबा रॉक्स बाकी शॉक! नाचता नाचता हवेतच उडू लागले, डान्स फ्लोअरवर लावली आग

शामनं हातामध्ये एक पोस्टरही घेतलं आहे. यावर लिहिलं आहे, की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. दुसऱ्या बोर्डवर त्यानं लिहिलं आहे, की तू माझ्यावर चुकीचे आरोप करून दुसऱ्यासोबत का गेली. महिलेचं असं म्हणणं आहे की शाम तिचा छळ करत असे. तिला मारहाण करत असे. याच कारणामुळे तिनं पहिलं सासर सोडलं. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. वारंवार घटस्फोटाची मागणी करूनही शामनं घटस्फोट दिलेला नाही. महिलेनं हे स्पष्टपणे सांगितलं, की ती शामसोबत परत जाणार नाही.

First published:
top videos

    Tags: Marriage, Viral news, West bengal, Wife and husband