मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नमंडपातच चढला नवरीचा पारा; पाहताच घाबरून नवरदेवानं केलं असं काही की पाहुणेही हैराण, VIDEO

लग्नमंडपातच चढला नवरीचा पारा; पाहताच घाबरून नवरदेवानं केलं असं काही की पाहुणेही हैराण, VIDEO

स्टेजवरच नवरीचा हा राग पाहून नवरदेवही घाबरतो आणि पुढे सरकतो. यानंतर नवरी पुन्हा एकदा पुढे येऊन नवरदेवाला वरमाळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करते

स्टेजवरच नवरीचा हा राग पाहून नवरदेवही घाबरतो आणि पुढे सरकतो. यानंतर नवरी पुन्हा एकदा पुढे येऊन नवरदेवाला वरमाळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करते

स्टेजवरच नवरीचा हा राग पाहून नवरदेवही घाबरतो आणि पुढे सरकतो. यानंतर नवरी पुन्हा एकदा पुढे येऊन नवरदेवाला वरमाळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करते

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : लग्नातील वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव आणि नवरीची मस्करी आणि मस्ती तर तुम्ही अनेकदा पाहिली असेल. काही लोक तर मस्करीत असंही काहीतरी करून जातात, जे पाहून पाहुणेही हैराण होतात. अनेकदा असं पाहायला मिळतं, की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाळा घालत असताना नवरदेवाचे मित्र त्याला मागे ओढू लागतात किंवा उचलून घेतात आणि नवरी त्याला वरमाळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करते. मग जेव्हा नवरीची वेळ येते, तेव्हा तीदेखील मागे हटत नाही. मात्र, कधी कधी मस्करीच्या नादात परिस्थिती गंभीर होऊन जाते.

नवरीला हरवण्यासाठी नवरदेवानं केले आटोकाट प्रयत्न; तरीही मानावी लागली हार, Video

सोशल मीडियावर (Social Media) सतत नवरी आणि नवरदेवाचे अजब व्हिडिओ व्हायरल (Weird Video of Bride and Groom) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पाहायला मिळतं, की वरमाळेच्या कार्यक्रमासाठी नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. यानंतर नवरी वरमाळेसाठी पुढे येते. इतक्यात नवरदेव मागे धावू लागतो. त्याचे मित्रही त्याला मागे खेचू लागतात. इतक्यात नवरी पुन्हा एकदा वरमाळा घालण्याचा प्रयत्न करते मात्र अपयशी ठरते. हे पाहून नवरीला पारा चढतो. यानंतर ती नवरदेवाला ओरडून पुढे येण्यास सांगते.

स्टेजवरच नवरीचा हा राग पाहून नवरदेवही घाबरतो आणि पुढे सरकतो. यानंतर नवरी पुन्हा एकदा पुढे येऊन नवरदेवाला वरमाळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि दोनवेळा प्रयत्न करून अखेर ती यात यशस्वी ठरते. यादरम्यान नवरदेवाचे मित्र त्याला पुन्हा मागे ओढतात. मात्र, यावेळी नवरी वरमाळा घालतेच.

VIDEO - नवरी जोमात नवरा कोमात! नवरीबाईचं ते रूप पाहून नवरदेवाला बसला जोर का झटका

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video)शेअर केला गेला आहे. व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅश्टॅगचा वापर केला गेला आहे. या व्हिडिओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video