मराठी बातम्या /बातम्या /Viral /उत्साहात नाचणाऱ्या नवरीसोबत विचित्र घडलं; कॅमेऱ्यासमोरच धाडकन कोसळली, Video Viral

उत्साहात नाचणाऱ्या नवरीसोबत विचित्र घडलं; कॅमेऱ्यासमोरच धाडकन कोसळली, Video Viral

एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंडपात जाण्यापूर्वी गाण्यावर व्हिडिओ शूट करत आहे, यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंडपात जाण्यापूर्वी गाण्यावर व्हिडिओ शूट करत आहे, यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंडपात जाण्यापूर्वी गाण्यावर व्हिडिओ शूट करत आहे, यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 26 डिसेंबर : तुम्ही जर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला पाकिस्तानी व्हायरल गर्ल आयशाबद्दल माहिती असेलच. एक गाणं आणि तिच्या डान्स स्टेप्सने तिला जगभरात प्रसिद्ध केलं. आता त्या गाण्याची क्रेझ इतकी आहे की सगळ्यांनी त्यावर रिल्स बनवायला सुरुवात केली. पण सध्या एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंडपात जाण्यापूर्वी या गाण्यावर व्हिडिओ शूट करत आहे, यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

रेल्वे रूळावर पडला व्यक्ती, अंगावरुन अख्खी ट्रेन गेली पण..पुढे 'चमत्कार' घडला, चकित करणारा VIDEO

या गाण्यावर तुम्ही शेकडो रील्स पाहिल्या असतील, पण वधूचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खळखळून हसवेल. व्हिडिओमध्ये लेहेंगा घातलेली एक सुंदर नववधू व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्यासोबत नको ते घडतं. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की, ही बातमी लिहिपर्यंत 60 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.

लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो, मग ती वधू असो किंवा वर. प्रत्येकाला हा क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा असतो, पण प्रत्येक गोष्ट परफेक्ट होईलच असं नाही. आता हा व्हिडिओ तुम्हीच बघा, जिथे नववधू मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर डान्स करत आहे. अगदी आनंदात ती या गाण्यावर डान्स करत आहे. मात्र, इतक्यात आपल्या हेवी लेहंग्यामुळे ती धाडकन खाली कोसळते. नवरी खाली पडताच व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती तिला उचलण्यासाठी येतो. हा संपूर्ण प्रकार इतका मजेशीर वाटतो, की नवरी स्वतःही हसू लागते.

चिमुकल्यांनी वाचवले आईचे प्राण, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

हा व्हिडिओ x._.love.07 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 3 लाख 42 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत म्हटलं की हे गाणं आणि हा व्हिडिओ आता नवरीला आयुष्यभर लक्षात राहील.

First published:
top videos

    Tags: Bride, Video viral, Wedding video