नवी दिल्ली 30 एप्रिल : लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे खळखळून हसवतात. काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भरपूर पसंतीस पडतात आणि सगळ्यांचं मन जिंकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं मनही प्रसन्न होईल. व्हिडिओ लग्नातील वरमाळेच्या कार्यक्रमातला आहे. वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान असं काही घडतं, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसेल (Bride Falls down During Wedding Ceremony). राफ्टिंगदरम्यान नदीत कोसळल्या 2 तरुणी; ऋषिकेशमधील धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठा अपघात होतो आणि वरमाळेचं स्टेज उलटतं. यानंतर वधू खाली पडू लागते. इतक्यात नवरदेव जे काही करतो, ते पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा असतात, इतक्यात हे स्टेज तुटतं. यानंतर नवरदेव अगदी क्षणात हिरोप्रमाणे आपल्या नवरीबाईला उचलून घेतो आणि पडण्यापासून वाचवतो
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव आपल्या नवरीची वाट पाहत आहे. यानंतर नवरीबाई स्टेजवर येताना दिसते. वधूचा प्रवेश अतिशय प्रेक्षणीय पद्धतीने केला जातो. वधू लाल रंगाच्या लेहंग्यात खूप सुंदर दिसते. यानंतर, ती वरमाळेच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर पोहोचते. यानंतर हा कार्यक्रम पार पडतो. यानंतर दोघंही स्टेजवरुन उतरण्याच्या तयारीत असतात. पतीनं अचानक घटस्फोट दिल्यानं डिप्रेशनमध्ये गेली; अनेक वर्षांनी सोबतचे फोटो बघताना समजलं धक्कादायक कारण तुम्ही पाहू शकता की नवरदेव आधीच दोन पायऱ्या खाली उतरतो, जेणेकरून नवरीचा हात पकडून तिला खाली उतरायला मदत करता येईल. मात्र इतक्यात स्टेज तुटतो आणि नवरी खाली पडू लागते. इतक्यात नवरदेव क्षणाचाही विलंब न करता लगेचच तिला उचलून घेतो. हे पाहून तिथले सगळेच लोक आश्चर्यचकीत होतात. नवरदेवाने ज्या पद्धतीने आपल्या नवरीला खाली पडण्यापासून वाचवलं, त्याने सगळ्य़ांचंच मन जिंकलं. यानंतर तिथे उपस्थित सर्व पाहुणे टाळ्या वाजवू लागतात. हा व्हिडिओ Amazing News नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला गेला आहे.