जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पतीनं अचानक घटस्फोट दिल्यानं डिप्रेशनमध्ये गेली; अनेक वर्षांनी सोबतचे फोटो बघताना समजलं धक्कादायक कारण

पतीनं अचानक घटस्फोट दिल्यानं डिप्रेशनमध्ये गेली; अनेक वर्षांनी सोबतचे फोटो बघताना समजलं धक्कादायक कारण

पतीनं अचानक घटस्फोट दिल्यानं डिप्रेशनमध्ये गेली; अनेक वर्षांनी सोबतचे फोटो बघताना समजलं धक्कादायक कारण

नतालीच्या पतीने तिला अचानक घटस्फोट दिला. यामागे त्यानं कोणतेही विशेष कारण सांगितलं नाही. नतालीनेही बळजबरी

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 30 एप्रिल : प्रेमात झालेली फसवणूक (Cheating in Love) माणसाला आतून पूर्णपणे तोडू शकते. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर त्याच्यापासून वेगळं होणंच तुम्हाला दुःखाच्या सागरात ढकलू शकतं. मात्र, नातं तुटण्याआधीच समोरची व्यक्ती तुम्हाला धोका देत असल्याचं समजलं तर? नतालीसोबतही असंच घडलं. नताली नावाची ही महिला पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती. अलीकडेच ती तिच्या आधीच्या पतीसोबतचे जुने फोटो पाहत होती. यादरम्यान तिची नजर अशा फोटोवर पडली, जो पाहून तिच्या दुःखाचं रुपांतर तिरस्कारात झालं. VIDEO: व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळला व्यक्ती; पुढे जे केलं ते पाहून खळखळून हसाल नतालीच्या पतीने तिला अचानक घटस्फोट दिला. यामागे त्यानं कोणतेही विशेष कारण सांगितलं नाही. नतालीनेही बळजबरी केली नाही आणि घटस्फोटानंतर आपल्या मुलांसह वेगळं राहू लागली. या घटस्फोटाने नतालीला मोठा धक्का बसला होकी. ती डिप्रेशनमध्ये गेली आणि तिला अनेक दिवस कॉउंसलिंगमधून जावं लागलं. यादरम्यान नुकतीच रडत रडत ती तिच्या आधीच्या पती आणि मुलांसोबत अमेरिकेतील डिस्नेलँडमध्ये गेले असतानाचे फोटो पाहत होती. यातील एक फोटो पाहताच तिला तिच्या घटस्फोटाचं खरं कारण कळालं.

News18

नताली तिच्या पती आणि मुलासह डिस्नेलँडला गेली होती. यादरम्यान त्यांनी नॅनीलाही सोबत घेतलं होतं. नतालीने विचार केला की नॅनी तिला तिच्या मुलांची काळजी घेण्यास मदत करेल. पण वास्तव काही वेगळंच निघालं. तिथे नॅनी मुलाऐवजी तिच्या नवऱ्याची काळजी घेताना दिसली. सुटीदरम्यान काढलेल्या एका फोटोतून पती आणि नॅनी यांच्यातील प्रेमकहाणी उघड झाली. या फोटोमध्ये नतालीचा पती नॅनीच्या अगदी जवळ दिसत होता. जुन्या कौटुंबिक हॉलिडे पिक्चरवरून नतालीला दोघांच्या अफेअरची माहिती मिळाली. एअरपोर्टवर BF ने केलं ब्रेकअप, तरुणीने विमान हलवून टाकलं; शेवटी एअरलाइन्सने… हा फोटो पाहिल्यानंतर नतालीने जेव्हा तिच्या एक्सबद्दल माहिती घेतली तेव्हा असं समोर आलं की घटस्फोटानंतर त्याने नॅनीशी लग्न केलं (Man get Married with Nanny) आणि आता दोघांना एक मूलही आहे. ज्या नवर्‍यापासून वेगळं होण्याचं तिला दु:ख होतं, त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर तिने आपल्या पतीचा तिरस्कार करायला सुरुवात केली. भविष्यात तिची मुलं याबद्दल काय विचार करतील एवढीच तिला चिंता आहे. त्यांना हे जाणून चांगला वाटणार नाही, की त्यांच्या वडिलांनी नॅनीसाठी त्यांच्या आईला धोका दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात