देहरादून 30 एप्रिल : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत बहुतांश लोक थंड हवेच्या ठिकाणी जात आहेत. उत्तराखंडचे ऋषिकेश हे सध्या पर्यटकांची पहिली पसंती आहे. इथे येणारे बहुतांश पर्यटक राफ्टिंग करताना दिसतात. या दरम्यान बोटीवर लाइफ जॅकेट घातलेले पर्यटक नदीच्या जोरदार प्रवाहावर सवारी करताना दिसतात. VIDEO: व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळला व्यक्ती; पुढे जे केलं ते पाहून खळखळून हसाल सध्या इथे कधी-कधी मोठे अपघातही घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात ऋषिकेशला आलेल्या दोन पर्यटक मुली राफ्टिंगच्या वेळी अपघाताला बळी पडल्या (Two Girls Fell in River during Rafting) आणि नदीच्या जोरदार प्रवाहात वाहू लागल्या. शुक्रवारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही घटना पाहायला मिळाली. घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) हून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. मात्र या परिस्थितीत भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या सदस्याने सतर्कता दाखवत दोन्ही मुलींना बुडण्यापासून वाचवलं.
Two civilian girls were rescued by one Indian Army Rafting team member today at Phool Chatti in Rishikesh. These girls fell out of a civilian raft and would have drowned if not rescued in time: Indian Army officials pic.twitter.com/tV4Qm8diQi
— ANI (@ANI) April 29, 2022
या बचावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विटरवर शेअर केला आहे. शेअर करण्यासोबतच कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘भारतीय लष्कराच्या राफ्टिंग टीमच्या एका सदस्याने ऋषिकेशमधील फूल छत्तीमध्ये दोन मुलींना बुडण्यापासून वाचवले. या मुली बोटीतून पडल्या होत्या आणि वेळीच बचाव न केल्यास त्या बुडाल्या असत्या.’ पोलिसाने ठाण्यात तक्रार घेऊन पोहोचलेल्या महिलेकडून करून घेतली मसाज; संतापजनक VIDEO सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला बातमी देईपर्यंत 61 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. नदीत पडलेल्या दोन मुलींना वाचवणाऱ्या लष्कराच्या जवानांचं अनेकांनी कौतुक केलं आहे.