मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - अरे हिला आवरा! नवरीबाई जोशात असं काही करू लागली नवरदेवही लाजला; सर्वांना हाका मारू लागला

VIDEO - अरे हिला आवरा! नवरीबाई जोशात असं काही करू लागली नवरदेवही लाजला; सर्वांना हाका मारू लागला

नवरीने असं रूप पाहून नवरदेवालाही वाटली लाज.

नवरीने असं रूप पाहून नवरदेवालाही वाटली लाज.

नवरीने लग्नात असं काही केलं ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 28 जानेवारी : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवरीबाईला लग्नात चांगलाच जोश चढला. जोशात भरमंडपात स्टेजवर असं काही करू लागली की नवरदेवालाही लाज वाटली. शेवटी न राहवून नवरदेव इतरांनाही हाका मारून स्टेजवर बोलावू लागला. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

लग्न म्हटलं की मजामस्ती आलीच. फक्त कुटुंब, नातेवाईक, मित्रमैत्रिणी नव्हे तर नवरा-नवरीही आपल्या लग्नात धम्माल करताना दिसतात. अशीच आपलं लग्न एन्जॉय करणारी ही नवरीबाई. जी आऊट ऑफ कंट्रोल झाली आणि असं काही करू लागली की नवरदेवही तिला पाहतच राहिला.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. गाणं वाजतं आहे. गाणं ऐकल्यानंतर नवरीबाई आऊट ऑफ कंट्रोल होते आणि ती डान्स करू लागते. तिच्यासोबत इतर मुलंमुलीही डान्स करताना दिसते आहे. ती नाच करण्यात इतकी दंग होते की शेजारी असलेल्या नवरदेवालाही विसरते.

हे वाचा - आता हद्दच झाली राव! भरमंडपातच त्याने नवरीला..., नवरदेवाच्या मित्राच्या विचित्र कृत्याचा VIDEO VIRAL

नवरीबाईला असं काही करताना पाहून नवरदेवही लाजला. नवरीकडे तो टकमका पाहतच राहिला. नवरीला असं नाचताना पाहून त्यालाही लाज वाटत होती. तो तिला पाहून हसत होता.

इतक्यात नवरी त्याचा हात धरते आणि त्यालाही डान्स करायला सांगते. नवरदेवाला कदाचित डान्स करायला येत नाही त्यामुळे तो किंचितशी कंबर हलवतो. त्यानंतर हात वर करून बाकी सर्वांना स्टेजवर बोलवताना दिसतो.

व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. i_love_yau_1430 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येतआहेत. नवरीचा डान्स पाहून बिच्चाऱ्या नवरदेवाला लाज वाटते आहे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

हे वाचा - चर्चा तर होणारच! कपलने केलं असं लग्न की शाही विवाह, डेस्टिनेशन वेडिंगही फेल; पाहा WEDDING PHOTO

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं, नवरीबाईचा अंदाज तुम्हाला आवडला का? नवरदेवाचे एक्स्प्रेशन पाहून तुम्हाला काय वाटतं? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Bridegroom, Couple, Dance video, Marriage, Viral, Viral videos, Wedding, Wife and husband