जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / प्रेम, लग्न, मग ब्लॅकमेल, निक्की यादव खून प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, 'मॅरेज सर्टिफिकेट'वरुन वाढला विषय

प्रेम, लग्न, मग ब्लॅकमेल, निक्की यादव खून प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, 'मॅरेज सर्टिफिकेट'वरुन वाढला विषय

प्रेम, लग्न, मग ब्लॅकमेल, निक्की यादव खून प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, 'मॅरेज सर्टिफिकेट'वरुन वाढला विषय

Nikki Murder Case: दिल्लीतील निक्की यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : दिल्लीतील खळबळजनक निक्की यादव हत्या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोत पोलिसांसमोर अनेक धक्कादायक गुपिते उघड करत आहे. डेक्कन हेराल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरोपी साहिलने पोलिसांना सांगितले आहे की, त्याचे आणि निक्की यांनी आर्य समाजाच्या मंदिरात लग्न केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा दावा आहे की, निक्की त्याला लग्नाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होती. साहिल ज्या मुलीसोबत लग्न करणार होतो, त्या मुलीला पुराव पाठवण्याची धमकी निक्कीने दिली होती. साहिल गेहलोतने पोलीस चौकशीत निक्की यादवची हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे. हत्येनंतर निक्कीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा आणि त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. निक्की आणि साहिलचे लग्न कुठे झाले? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल आणि निक्कीचे लग्न ऑक्टोबर 2020 मध्ये ग्रेटर नोएडा येथील आर्य समाज मंदिरात झाले. मात्र, दोघांनीही निबंधक कार्यालयात लग्नाची नोंदणी केली नसल्याचा दावा आता केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिलने खुलासा केला आहे की, निक्कीजवळ त्यांचे लग्नाचे प्रमाणपत्र होते, जे आर्य समाज मंदिराने जारी केले होते. वाचा - रिसेप्शनसाठी तयार व्हायला गेलेले नवरी-नवरदेव; काही वेळाने मृतावस्थेत आढळले जेव्हा निक्कीला साहिल दुसऱ्या महिलेशी लग्न करणार असल्याची माहिती मिळाली तेव्हा तिने साहिलला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. इतकंच नाही तर साहिलने लग्नाला नकार दिला नाही तर लग्नाचं प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करेन किंवा तो ज्या महिलेशी लग्न करणार आहे त्या महिलेच्या कुटुंबियांना सर्व पुरावे देईन, अशी धमकीही निक्कीने दिली होती.

News18लोकमत
News18लोकमत

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी निक्कीचा मृतदेह मिळाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिल्लीच्या बाहेरील मित्राव गावात आरोपी साहिलच्या मालकीच्या ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये निक्की यादवचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी 10 फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या केली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याने दुसरे लग्न केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलचे वडील, त्याचे दोन चुलत भाऊ आशिष, नवीन आणि दोन मित्र अमर आणि लोकेश यांनाही संपूर्ण कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात