मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आता तर प्रेमात हद्दच झाली! गर्लफ्रेंडसाठी त्याने जे केलं ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल

आता तर प्रेमात हद्दच झाली! गर्लफ्रेंडसाठी त्याने जे केलं ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल

तिच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्याने नको तेच केलं.

तिच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्याने नको तेच केलं.

तिच्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्याने नको तेच केलं.

  • Published by:  Priya Lad

बँकॉक, 17 डिसेंबर : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमासाठी (Love) काही जण वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. अगदी प्रेसाठी जीव घेऊ शकतात आणि जीव देऊही शकता. प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रेमाची परीक्षा म्हणून काही लोक काय काय नाही करत. असे बरेच किस्से तुम्हाला माहिती असतील. पण एका तरुणाने आपलं किती प्रेम आहे हे तरुणीला दाखवण्यासाठी जे केलं ते त्याचा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल.

थायलँडमधील एका तरुणाचं एका तरुणीवर खूप प्रेम होतं. पण अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून त्याच्यापासून दूर गेली. यादरम्यान आपण तिच्यावर किती खरं प्रेम करतो हे दाखवण्यासाठी या तरुणाने तर हद्दच पार केली. त्याने चक्क आपल्या प्रायव्हेट पार्टला टाळंच लावण्याचा निर्णय घेतला (Man Sealed Private Part) आणि त्याचा भयंकर परिणाम झाला.

हे वाचा - तरुणाने भररस्त्यात तरुणींना करायला लावलं असं काम; VIDEO पाहून तुम्हीही शॉक व्हाल

थायलंडमधील Sanook वेबसाईट या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. या तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला तो तिच्यावर किती प्रेम करतो हे दाखवायचं होतं. आपल्या प्रेमाचा पुरावा म्हणून त्याने आपल्या गुप्तांगावर टाळां लावलं. प्रेमिका दूर गेल्यानंतर त्याचं लक्ष दुसऱ्या कोणत्या मुलीकडे विचलित होऊ नये किंवा गर्लफ्रेंडच्या मनात कोणता संशय निर्माण होऊ नये, असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याने असा खतरनाक निर्णय घेतला.

या व्यक्तीच्या आईने संगितलं की, ज्यावेळी तिला याबाबत समजलं त्याच्या दोन दिवस आधीच त्याची गर्लफ्रेंड घरी आली होती. ती शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जात होती. यामुळेच ती व्यक्ती चिंतेत होती. तिच्यावर तो किती प्रेम करतो हे त्याला दाखवायचं होतं. त्यामुळे तिच्यासमोरच त्याने प्रायव्हेट पार्टला टाळं लावलं.

हे वाचा - विचित्र! घरी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर मागितले पैसे

दोन दिवसांनंतर त्याच्या खोलीतून कुणीतही वेदनेने ओरडत असल्याचा आवाज आला. जेव्हा त्याची आई रूममध्ये गेली तेव्हा तो तडफडताना दिसत होता. तिने लगेच आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्याचा प्रायव्हेट पार्ट पाहताच धक्का बसला. तब्बल 48 तास टाळं लावल्याने त्याचं गुप्तांग खूप सूजलं होतं. डॉक्टरांनी चावीने ते टाळं खोललं. काही वेळ त्या व्यक्तीला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं.

First published:

Tags: Couple, PRIVATE part, Relationship