नवी दिल्ली 13 डिसेंबर : जगभरात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आणि विविध जीव अस्तित्वात आहेत. यातील काही शिकारी असतात तर काही माणसांचे अतिशय चांगले मित्र असतात. कुत्रा, घोडा, हत्ती हे असे प्राणी आहेत, जे मोठ्या प्रमाणात पाळले जातात आणि माणसांसोबत त्यांचं अगदी जवळचं नातं असतं (Elephant and Human Bonding). विशेषतः हत्तीबद्दल बोलायचं झाल्यास या प्राण्याला आपल्या केअरटेकरबद्दल (Caretaker) विशेष आपुलकी असते. हे प्राणी अनेक वर्षांनंतर आपल्या केअरटेकरला भेटले नाहीत तरी त्याला विसरत नाहीत. सोशल मीडियावर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Elephant) होत आहे. यात दिसतं की एका वर्षांनंतर हे हत्ती आपल्या केअरटेकरला भेटतात. मात्र यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य़ वाटेल. भर मैदानात खेळाडूनं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून येईल डोळ्यांत पाणी प्राण्यांचं आणि माणसाचं नातं अतिशय अनोखं असतं. यांच्या मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. अनेक चित्रपटांमध्येही आपल्याला हे पाहायला मिळतं. हत्ती आणि माणसाच्या मैत्रीवर तर अनेक चित्रपटही आले आहेत. हे चित्रपट लोकांच्या पसंतीसही उतरतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओदेखील काहीसा असाच आहे.
Elephants react for the first time in over a year when they see their beloved caretaker.#Tiredearth pic.twitter.com/T3iwSsPutn
— Green Planet (@Elizabeth_Ruler) December 9, 2021
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलात हत्तींचा एक कळप आहे, हे हत्ती जवळ उभा असलेल्या व्यक्तीला आधी निरखून बघतात आणि नंतर त्याच्या मागे धावू लागतात. यादरम्यान काही हत्ती मोठमोठ्या ओरडूही लागतात. काही वेळानंतर हा व्यक्ती हत्तींची भेट घेतो आणि मग हे हत्ती त्याच्यासोबत चालू लागतात. हे दृश्य अतिशय खास आहे. हे पाहून असं वाटतं जणू एखादा व्यक्ती अनेक वर्षांपूर्वी वेगळं झालेल्या आपल्या एखाद्या खास व्यक्तीला भेट आहे. आईला आपल्याच मुलाची वाटते घृणा, कारण वाचून कुणालाही येईल दया हा व्यक्ती हत्तींचा केअरटेकर आहे. जो तब्बल एका वर्षानंतर त्यांना भेटला. ज्या पद्धतीने हत्ती या व्यक्तीसोबत चालू लागतात ते पाहून असं वाटतं जणू हे या व्यक्तीचे अगदी खास मित्र आहेत आणि कधीही साथ न सोडण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर Green Planet नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 30 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 2 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.