नवी दिल्ली 21 ऑगस्ट : गाणी आणि डान्सशिवाय लग्नाची मजा अपुर्णच आहे. आजकाल तर नातेवाईकांसोबतच नवरी आणि नवरदेवही आपल्या लग्नात डान्स (Dance Video of Bride and Groom) करताना दिसतात. सोशल मीडिया साईट्सवर नवरी आणि नवरदेवाच्या (Bride Groom Video) डान्सचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल (Viral on Social Media) होतात. लाजणारी नवरी, मस्ती करणाऱ्या मैत्रिणी अन् दीर यांचे व्हिडिओ (Wedding Videos) तर विशेष लोकप्रिय होतात. सध्या एका नवरीबाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. VIDEO : आपसात भिडल्या विद्यार्थीनी; एकमेकींची लाथा-बुक्क्यांनी केली धुलाई या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरीबाई रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. नवरीचा ब्राईडल लूक (Bridal Look), आसपासचं वातावरण आणि गाड्यांचे नंबर पाहून याचा अंदाज येत आहे, की हा व्हिडिओ परदेशातील आहे. मात्र, कोणीतरी हा व्हिडिओ एडिट करून याच्या बॅकग्राऊंडचं गाणं बदललं आहे.
अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाताच महिलेला दिसलं भलतंच; पतीचा कारनामा पाहून हादरली नवरीचा हा अजब डान्स (Bride Dance Video) पाहून सुरुवातीला नवरदेव हैराण होतो मात्र नंतर नवरीला साथ देण्यासाठी तोदेखील पुढे येतो. यानंतर आपल्या नवरीबाईसोबत नवरदेवही रस्त्यावरच थिरकू लागतो. हा व्हिडिओ कोणीतरी एडिट केला असून याच्या बॅकग्राऊंडला बचपन का प्यार (Bachpan Ka Pyar) हे गाणं सेट केलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 94 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी नवरीचा डान्स विनोदी असल्याचं म्हटलं आहे.