मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : डान्स करताना केलेली एक चूक भोवली; मंडपातच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव

VIDEO : डान्स करताना केलेली एक चूक भोवली; मंडपातच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव

व्हिडिओ पाहून असं लक्षात येतं की नवरीबाईचा गाऊन कदाचित इतका जड आहे, की गाऊन सांभाळण्याच्या नादात तिचा स्वतःचाच तोल जातो. हा व्हिडिओ इतरांनाही सावध करणारा आहे

व्हिडिओ पाहून असं लक्षात येतं की नवरीबाईचा गाऊन कदाचित इतका जड आहे, की गाऊन सांभाळण्याच्या नादात तिचा स्वतःचाच तोल जातो. हा व्हिडिओ इतरांनाही सावध करणारा आहे

व्हिडिओ पाहून असं लक्षात येतं की नवरीबाईचा गाऊन कदाचित इतका जड आहे, की गाऊन सांभाळण्याच्या नादात तिचा स्वतःचाच तोल जातो. हा व्हिडिओ इतरांनाही सावध करणारा आहे

नवी दिल्ली 13 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा लग्न समारंभातील व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. यातले नवरी आणि नवरदेवाचे व्हिडिओ लोकांच्या विशेष पसंतीस पडतात. हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की असे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिले जातात आणि याला भरपूर कमेंटही मिळतात. कधी कपलचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी त्यांची मस्ती पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात नवरी आणि नवरदेव डान्स (Dance Video of Bride Groom) करताना दिसतात. मात्र, पुढच्याच क्षणी त्यांचा सगळा आनंदच गायब होतो.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव एकमेकांसोबत डान्स करत आहेत. तर घरातील इतर लोक आणि त्यांचे मित्र त्यांना प्रोत्साहन देत आहेत. नवरी बॉल गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र, याचदरम्यान नवरीबाईचा बॅलन्स बिघडतो आणि ती खाली झुकते. अचानक हे झाल्यामुळे नवरदेवालाही स्वतःला सावरण्यासाठी वेळ मिळत नाही आणि दोघंही धाडकन खाली कोसळतात.

गर्लफ्रेंडच्या लग्नात जाण्यासाठी खटाटोप; साडी नेसून महिलेप्रमाणे नटला पण..,VIDEO

व्हिडिओ पाहून असं लक्षात येतं की नवरीबाईचा गाऊन कदाचित इतका जड आहे, की गाऊन सांभाळण्याच्या नादात तिचा स्वतःचाच तोल जातो. हा व्हिडिओ इतरांनाही सावध करणारा आहे, की जर तुम्ही लग्नात जड ड्रेस घालत असाल तर डान्स करताना विशेष काळजी घ्यायला हवी.

हा व्हिडिओ wedding.pages नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'फॉलिंग इन लव्ह तर ऐकलं आहे, पण हे...नवरदेवाच्या उंचीलाही दोष देऊ शकत नाही आणि नवरीच्या जड ड्रेसलाही.' 7 जानेवारीला अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 80 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा आकडा सतत वाढत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

GF च्या लग्नात BF ची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं; पुढे काय घडलं पाहा VIDEO

एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, यालाच म्हणतात Fall in love. याशिवाय काही यूजर्सनी नवरीच्या गाऊनचंही कौतुक केलं आहे. तर काहींनी कपलबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय काही लोक या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींनाही टॅग केलं आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video