Home /News /viral /

गर्लफ्रेंडच्या लग्नात जाण्यासाठी तरुणाचा खटाटोप; साडी नेसून महिलेप्रमाणे नटला पण..., VIDEO

गर्लफ्रेंडच्या लग्नात जाण्यासाठी तरुणाचा खटाटोप; साडी नेसून महिलेप्रमाणे नटला पण..., VIDEO

एका व्यक्तीने महिला बनवण्यासाठी नवरीप्रमाणेच वेशभूषा केली आणि तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरात शिरला. त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न (Girlfriend's Marriage) होतं.

  नवी दिल्ली 13 जानेवारी : कधीकधी प्रेमात लोक असं काही करतात, ज्याबाबत कोणी विचारही केलेला नसतो. प्रेमात माणूस आंधळा होतो, ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. हेच सिद्ध करणारे कित्येक लोक आजही आहेत. अशीच एक घटना नुकतीच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) भदोही जिल्ह्यात पाहायला मिळाली. यात एका व्यक्तीने महिला बनवण्यासाठी नवरीप्रमाणेच वेशभूषा केली आणि तो आपल्या गर्लफ्रेंडच्या घरात शिरला. त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न (Girlfriend's Marriage) होतं. याचमुळे तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटण्यासाठी थेट तिच्या घरीच पोहोचला. GF च्या लग्नात BF ची एंट्री! नवरदेवासमोरच प्रपोज केलं; पुढे काय घडलं पाहा VIDEO मुलीच्या घरच्यांना संशय आल्याने त्याचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. या घटनेचा व्हिडिओ काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला (Video Viral on Social Media). व्हिडिओमध्ये या व्यक्तीने लाल साडी, विग, बांगड्या घातलेल्या दिसत आहेत आणि त्याने मेकअपही केला आहे. हा व्यक्ती अगदी नवरीसारखाच दिसत आहे. तरुणी जेव्हा लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी पूर्णपणे तयार होती आणि घरात अगदी आनंदात सर्व तयारी सुरू होती, तेव्हाच हा प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला.
  View this post on Instagram

  A post shared by Meme wala (@memewalanews)

  व्हिडिओमध्ये हा व्यक्ती साडीमध्ये दिसतो आणि चारही बाजूंनी लोकांनी त्याला घेरलं आहे. हे लोक हैराणही झाले आहेत आणि रागातही दिसत आहेत. काही लोक त्याच्या चेहऱ्यावरील पदर काढण्याचाही प्रयत्न करत आहेत. मात्र तो आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत आहे. VIDEO: तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी युवकाचं विचित्र कृत्य; जिममध्येच झाली फजिती सुरुवातीला या तरुणाला वाटलं की मुलीप्रमाणे वेशभूषा करून तो तरुणीच्या रूममध्ये अगदी सहज पोहोचेल. मात्र, असं काहीही झालं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती देण्याआधीच हा तरुण आपल्या दोन मित्रांसोबत तिथून फरार झाला.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Viral video on social media, Wedding video

  पुढील बातम्या