जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवरदेव मिठाई खाऊ घालत होता, पण भडकलेल्या नवरीनं केलं भलतंच कृत्य; पाहा अजब Wedding Video

नवरदेव मिठाई खाऊ घालत होता, पण भडकलेल्या नवरीनं केलं भलतंच कृत्य; पाहा अजब Wedding Video

नवरदेव मिठाई खाऊ घालत होता, पण भडकलेल्या नवरीनं केलं भलतंच कृत्य; पाहा अजब Wedding Video

नवरदेव नवरीला मिठाई खाऊ घालू लागतो. मात्र नवरीबाई एकदम रागात दिसते (Angry Bride Video).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : देशभरात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. लग्नातील व्हिडिओ अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ नवरी आणि नवरदेवाचा (Viral Video of Bride and Groom) आहे. रिअल बाहुबली! हाताने धक्का देत फिरवलं रेल्वेचं इंजिन; VIDEO पाहून व्हाल अवाक या व्हिडिओमध्ये लग्नाच्या स्टेजवरच असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहावा वाटेल. कारण हा जितका हैराण करणारा आहे, तितकाच मजेशीरही आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की नवरी आणि नवरदेव लग्नाच्या स्टेजवर उभा आहेत. यादरम्यान वरमाळेचा कार्यक्रम सुरू आहे. तेव्हाच नवरदेव नवरीला मिठाई खाऊ घालू लागतो. मात्र नवरीबाई एकदम रागात दिसते (Angry Bride Video).

जाहिरात

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की नवरदेव नवरीला मिठाई खाऊ घालण्यासाठी हात पुढे करतो. नवरी ही मिठाई तर खात नाहीच पण नवरदेवाच्या हातातील मिठाई दूर फेकून देते. नव्या नवरीचं हे रूप पाहून सगळेच थक्क होतात. नवरीचं हे कृत्य पाहून नवरदेवासोबतच इतर नातेवाईकही हैराण होतात. यानंतर नवरदेवही नखरे दाखवायला सुरुवात करतो. नवरी जेव्हा नवरदेवाला ग्लासने पाणी पाजू लागते, तेव्हा नवरदेव पाणी पिण्यास नकार देतो.

दुचाकीवरच अनोख्या अंदाजात तरुणीला केलं प्रपोज; हा खास VIDEO एकदा बघाच

नवरदेवाने पाणी पिण्यास नकार देताच नवरी पुन्हा भडकते आणि ती हातातील ग्लासही दूर फेकून देते. हे पाहून पाहुणे आणखीच हैराण होतात. लग्नातील हा अजब व्हिडिओ पाहून नेटकरी मात्र पोट धरून हसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला गेला असून आतापर्यंत 1 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात