जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कुरकुरीत डोसा नाही तर डोशामध्ये 'कुरकुरे', या Weird Food मुळे संतापले खवय्ये; VIDEO VIRAL

कुरकुरीत डोसा नाही तर डोशामध्ये 'कुरकुरे', या Weird Food मुळे संतापले खवय्ये; VIDEO VIRAL

कुरकुरीत डोसा नाही तर डोशामध्ये 'कुरकुरे', या Weird Food मुळे संतापले खवय्ये; VIDEO VIRAL

एका विक्रेत्याने चक्क डोशामध्ये कुरकुरे (Dosa made with Kurkure) घालून नवा प्रयोग केला आहे. जिवाभावाच्या पदार्थासोबत केलेला असा हा खेळ (weird food combination) अनेक खवय्यांना मुळीच आवडला नाहीये.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 20 फेब्रुवारी: गेल्या काही काळापासून चित्रविचित्र पदार्थ (Weird Food) करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. सध्या विविध प्रकारच्या फूड रेसिपीज तयार करून त्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. अनेकदा पदार्थ चांगला बनवण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीजचं (Food Combination) कॉम्बिनेशन केलं जातं. काही जणांना ते आवडतं, तर अनेकांना ते अजिबात आवडत नाही. यामधल्या काही रेसिपीज पाहून खरंच कमाल वाटते. तो पदार्थ लगेचच घरी करून पाहण्याची इच्छा निर्माण होते. परंतु काही पदार्थ तर फारच विचित्र असतात. रस्त्यावरचे विक्रेते (Street Food Viral Video) क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली आयकॉनिक खाद्यपदार्थांशी खेळताना दिसतात. मॅगी आइस्क्रीम रोल या विचित्र कॉम्बिनेशनबद्दल खाद्यप्रेमींचा राग नुकता कुठे कमी होऊ लागला होता तेवढ्यात या विचित्र कॉम्बिनेशनमध्ये आणखी एक भर पडली आहे. एका विक्रेत्याने डोशावर असाच एक विचित्र प्रयोग केला आहे. तो प्रयोग पाहून खाद्यप्रेमी मंडळी संतापली आहेत. दाक्षिणात्य पदार्थ असलेला डोसा सर्वांनाच खूप आवडतो. फक्त दक्षिणेकडच्या प्रदेशात नाही, तर प्रत्येक शहरातल्या खाऊगल्लीमध्ये तुम्हाला डोशाचं दुकान दिसेल. चविष्ट असलेला मसाला डोसा, ओनियन डोसा, रवा डोसा असे खूप प्रकारचे डोसे आपण बनवू शकतो. कुरकुरीत डोसे सर्वांनाच आवडतात; पण एका विक्रेत्याने चक्क डोशामध्ये कुरकुरे (Dosa made with Kurkure) घालून नवा प्रयोग केला आहे. जिवाभावाच्या पदार्थासोबत केलेला असा हा खेळ (weird food combination) अनेक खवय्यांना मुळीच आवडला नाहीये. हे वाचा- नवरदेव मिठाई खाऊ घालत होता, पण भडकलेल्या नवरीनं केलं भलतंच कृत्य; अजब VIDEO आजकाल कोण कशात काय घालून खाईल, हे काही सांगता येत नाही. कुरकुरे घालून डोसा बनवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोसाप्रेमी मंडळी संतापली आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे, की एक दुकानदार तव्यावर डोसा बनवायला सुरुवात करतो. त्यात तो चिरलेला कांदा, चीज आणि नंतर चटणी घालताना दिसतो. हे सर्व मिक्स करून मग मसाल्यांची ग्रेव्हीही टाकतो; पण यानंतर तो संपूर्ण डोशावर कुरकुरे घालतो. या डोसा विक्रेत्याचा हा प्रयोग अनेक खाद्यप्रेमींना रुचलेला नाही.

    जाहिरात

    इन्स्टाग्रामवर thegreatindianfoodie नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडलाही आहे. 10 हजारांहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. ‘दिल्लीकरांचा हा प्रयोग पाहून माझा माणुसकीवरचा विश्वास उडला,’ अशी कमेंट एका युझरने केली आहे. आणखीही काही युझर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. चित्रविचित्र पदार्थ पाहून नेटकरी जणू आपली तहान-भूक विसरले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात