मराठी बातम्या /बातम्या /Viral /पेट्रोल परवडत नाही? नो टेंशन! आता आली पाण्यावर चालणारी गाडी, पाहा हा VIDEO

पेट्रोल परवडत नाही? नो टेंशन! आता आली पाण्यावर चालणारी गाडी, पाहा हा VIDEO

इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या या युगात अशी कार आली तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या या युगात अशी कार आली तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या या युगात अशी कार आली तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : देशात पेट्रोलचे दर (Petrol price) दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामन्यांना गाडी घेणे आणि चालवणे स्वप्नासारखे वाटू लागले आहे. इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत महागाईच्या या युगात अशी कार आली तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. मात्र मध्य प्रदेशातील एका मेकॅनिकने हे पराक्रम केले आहेत.

44 वर्षीय मोहम्मद रईस महमूद मकरानी यांनी पेट्रोल, डिझेल किंवा गॅसवर नव्हे तर पाण्यावर चालणारी कार तयार केली आहे. पाण्यावरून धावत असलेल्या या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.ही पाण्यावर चालणारी कार मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या 44 वर्षीय रईस मोहम्मद मकरानी यांनी तयार केली आहे. मोहम्मद व्यवसायाने मेकॅनिक आहेत आणि फक्त बारावी पास आहेत.

रईस मकरानी यांनी कोणतेही तांत्रिक अभ्यास न करता ही कामगिरी केली आहे. मोहम्मद मकरानी यांनी बनविलेल्या या पाणी चालविणाऱ्या कारचे पेटंटही त्यांनी दिले आहे. असे सांगितले जात आहे की, पेटंटच्या आधारे एक चिनी कंपनी ही कार तयार करणार आहे.

वाचा-अचानक पाण्याचा वाढला वेग अन् एकाला वाचवताना तिघे गेले वाहून, पाहा LIVE VIDEO

वाचा-चक्क 2 महिने त्याने Air Fryer मध्ये ठेवली सोन्याची चैन: कारण वाचून हेवा वाटेल

मारूती 800 ने तयार केली पाण्यावर चालणारी कार

2007 मध्ये त्यांनी हा प्रयोग सुरू केल्याचे मकरानी यांनी सांगितले. त्यानंतर, 2012 मध्ये, मारुती 800मध्ये एक बदल केला, आणि तीला पाण्यात धावणारी गाडी केली. इंजिन तयार करण्यास आणि सुरू करण्यास मकरानी यांना सुमारे दीड वर्ष लागले.

वाचा-'दिमाग खा गई...!' Alexa बरोबर झालं दिलजित दोसांझचं असं भांडण, पाहा VIDEO

या कारमध्ये 796 सीसी इंजिन आहे. यासह ही कार ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने धावते. या शोधासाठी दुबई आणि चीन कंपनीकडूनही मकरानी यांना करार मिळाला आहे. परंतु मेक इन इंडियाद्वारे प्रेरित झालेल्या मकरानी या विदेशी कंपन्यांच्या ऑफर नाकारल्या.

First published:
top videos

    Tags: Petrol price hike, Video viral