...आणि डोळ्यांदेखत कोसळली वीज, कॅमेऱ्यात कैद झाला अंगावर शहारे आणणारा VIDEO

...आणि डोळ्यांदेखत कोसळली वीज, कॅमेऱ्यात कैद झाला अंगावर शहारे आणणारा VIDEO

कधी दिवसाढवळ्या वीज पडल्याचे पाहिले आहे? असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उन्ह आणि निरभ्र आकाश असताना वीज कोसळलेली दिसत आहे.

  • Share this:

फ्लोरिडा, 16 ऑगस्ट : वीज कधीही आणि कुठेही कोसळू शकते. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वीजांचा गडगडाट झाला की, पाऊस पडतोच. मात्र कधी दिवसाढवळ्या वीज पडल्याचे पाहिले आहे? असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उन्ह आणि निरभ्र आकाश असताना वीज कोसळलेली दिसत आहे. हा व्हिडीओ रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. हा व्हिडीओ जोनाथन मुरे यांच्या कॅमेऱ्याच कैद झाला आहे. या व्हिडीओ दिसत आहे की, पावसाची काहीच चिन्ह नसताना वीज कोसळली. या व्हिडीओत निरभ्र आकाशातून एका झाडावर अचानक वीज कोसळलेली दिसत आहे.

वाचा-नदी पार करताना घसरला पाय, क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात मुलं गायब

वाचा-बुडत असलेल्या मित्रासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, मात्र दोघांनीही गमावला जीव

मुरे यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वीज कोसळणं हा अनपेक्षित प्रकार आहे. त्यात उन्हात वीज कोसळणे शक्यच नाही. 12 किमी दूर असलेल्या परिसरात वादळी परिस्थिती होती. कदाचित त्यामुळे वीज कोसळली असावी.

वाचा-प्रसिद्ध वेटलिफ्टरनं उचललं 400 किलोचं वजन,एका सेकंदात अशी झाली गुडघ्यांची अवस्था

याआधी प्रसिद्ध डिज्नी वर्ल्ड मधला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये वीज कोसळताना दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Published by: Priyanka Gawde
First published: August 16, 2020, 12:05 PM IST

ताज्या बातम्या