Home /News /viral /

लग्नाआधीच प्रेयसीचा अपघात; तरुणाने रुग्णालयातच बांधली लग्नगाठ पण..., शेवट वाचून पाणावतील डोळे

लग्नाआधीच प्रेयसीचा अपघात; तरुणाने रुग्णालयातच बांधली लग्नगाठ पण..., शेवट वाचून पाणावतील डोळे

34 वर्षाच्या जिम मॅनेजर ग्रेग पीटर्सची भेट 28 वर्षाच्या एना लेगरसोबत १८ महिन्यांआधी झाली होती. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं

    नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : सध्याच्या जगात अनेक लोक प्रेमात धोका दिसताना दिसतात. मात्र याच जगात एका व्यक्तीचं आपल्या प्रेयसीवर जीवापाड असलेलं प्रेम ऐकून तुमचेही डोळे पाणावतील (Emotional Love Story). ही कहाणी ब्रिटनमध्ये (Britain) राहणाऱ्या ग्रेग पीटर्सची (Greg Peters) आहे. ज्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न (Marriage with Girlfriend) केलं, त्यानं याचाही विचार केला नाही की ती किती काळ जगणार आहे. OMG! तरुणाने अजब पद्धतीनं मारले Push Ups; कधीही पाहिला नसेल असा VIDEO ग्रेग पीटर्स आणि त्याची गर्लफ्रेंज एना लेगर यांची कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. या प्रेमी जोडप्याचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या घरच्यांनाही काहीही तक्रार नव्हती. मात्र, कदाचित देवालाच त्यांचं आयुष्यभर सोबत राहाणं मान्य नव्हतं. लग्नाच्या काही वेळ आधीच एनाचा भयंकर अपघात झाला आणि यातून तिची वाचण्याची शक्यता जवळपास संपलेली होती. या परिस्थितीत तिचा बॉयफ्रेंड ग्रेगनं जे केलं ते कोणाचंही मन जिंकणारं होतं. द सनच्या वृत्तानुसार, 34 वर्षाच्या जिम मॅनेजर ग्रेग पीटर्सची भेट 28 वर्षाच्या एना लेगरसोबत १८ महिन्यांआधी झाली होती. दोघांचंही एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. काही काळातच आपण एकमेकांसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर असल्याचं त्यांना वाटू लागलं आणि त्यांचं लग्नही जवळपास फिक्स झालं. याच दरम्यान एक दिवस ऑफिसमधून परतताना एनाच्या गाडीचा भयंकर अपघात झाला. यात ती गंभीर जखमी झाली. रुग्णलायत दाखल करूनही तिची प्रकृती बिघडत होती. डॉक्टरांनी तिला ICU मध्ये शिफ्ट केलं आणि याच दरम्यान एना कोमात गेली. Lesbian Coupleचं करवा चौथ, डाबरच्या या जाहिरातीमुळे इंटरनेटवर खळबळ; पाहा VIDEO हे सर्व पाहून ग्रेग पीटर्सची अवस्था वाईट झाली होती. त्याला काहीही करून एनासोबत लग्न करायचं होतं. जेणेकरून तिचं नाव कायम त्याच्यासोबत राहिल. डॉक्टरांकडे भरपूर विनवण्या करून त्यानं रुग्णालयातील बेडवरच एनाला रिंग घातली आणि तिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर काहीच वेळात एनानं जगाता निरोप घेतला. कुटुंबीय आणि ग्रेगच्या सहमतीनं एनाचे सहा अवयव दान करण्यात आले. ग्रेननं म्हटलं, की कदाचित आमचं लग्न कायदेशीररित्या मान्य नसेल पण मी तिला अंगठी घालून मनातून माझी पत्नी मानलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Viral news

    पुढील बातम्या