• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! तरुणाने पायऱ्यांवरुन उतरत अजब पद्धतीनं मारले Push Ups; कधीही पाहिला नसेल असा VIDEO

OMG! तरुणाने पायऱ्यांवरुन उतरत अजब पद्धतीनं मारले Push Ups; कधीही पाहिला नसेल असा VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हाताच्या मदतीने पायऱ्यांवरुन उतरताना दिसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा व्यक्ती अतिशय आरामात पायऱ्यांवरुन खाली उतरत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 24 ऑक्टोबर : इंटरनेटवर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात तर काही व्हिडिओ पाहून स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Shocking Video Viral). व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाय नाही तर आपल्या हाताच्या सहाय्याने पायऱ्यावरून खाली उतरताना दिसतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला क्रॅब मॅन तर काहींनी विंचूप्रमाणे असणारा व्यक्ती म्हटलं आहे. कायच्या काय! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात पाहुणे; कारण जाणून व्हाल अवाक व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हाताच्या मदतीने पायऱ्यांवरुन उतरताना दिसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हा व्यक्ती अतिशय आरामात पायऱ्यांवरुन खाली उतरत आहे. व्हिडिओमध्ये पाहून असं वाटतं की याचे हात लोखंडाचे आहेत. पायऱ्यांवरुन उतरताच हा व्यक्ती जे काही करतो ते पाहून कदाचित तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जमिनीवर येताच तो एखाद्या विंचूप्रमाणे करू लागतो. अवघ्या 26 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर @HldMyBeer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ट्विटरवर शेअर झाल्यापासून आतापर्यंत 41 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा आकडा सातत्याने वाढतच आहे. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. VIDEO: आधी लगावले जोरदार ठुमके, मग ढसाढसा रडू लागली नवरी; कारण जाणून व्हाल हैराण एका यूजरने कमेंट करत लिहिलं, मी पण हे करू शकतो, पण स्वप्नात. दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहूनच माझे खांदे दुखायला लागले. आणखी एक कमेंट करत म्हटलं अद्भुत..हा व्यक्ती एखाद्या विंचूप्रमाणे चालत आहे. काही यूजर्सना हा व्हिडिओ फेकही वाटला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: