• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Lesbian Coupleचं करवा चौथ, डाबरच्या या जाहिरातीमुळे इंटरनेटवर खळबळ; पाहा VIDEO

Lesbian Coupleचं करवा चौथ, डाबरच्या या जाहिरातीमुळे इंटरनेटवर खळबळ; पाहा VIDEO

करवा चौथ या सणासाठी करण्यात आलेली ही जाहिरात डाबरचं प्रोडक्ट फेम क्रीम गोल्ड ब्लीचची (Dabur's Karwa Chauth Fem Ad) आहे. ही जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर इंटरनेटवर (Dabur Fem Controversial Ad) खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 ऑक्टोबर: सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. या काळात विविध ब्रँड्स ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जाहिराती करत असतात. डाबरची एक जाहिरात देखील चर्चेचा विषय बनली आहे. करवा चौथ या सणासाठी करण्यात आलेली ही जाहिरात डाबरचं प्रोडक्ट फेम क्रीम गोल्ड ब्लीचची (Dabur's Karwa Chauth Fem Ad) आहे. ही जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर इंटरनेटवर (Dabur Fem Controversial Ad) खळबळ उडाली आहे. या जाहिरातीबाबत दोन मतप्रवाह इंटरनेटवर पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर खासकरून ट्विटरवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काय आहे जाहिरातीमध्ये? या जाहिरातीत दोन तरुणी करवा चौथची (Karwa Chauth 2021) तयारी करत आहेत. ज्यात एक तरुणी दुसरीच्या चेहऱ्याला ब्लीच लावत आहे. तर त्या करवा चौथबाबत संभाषण देखील करत आहेत. त्यांनतर आणखी एक महिला येऊन त्यांना करवा चौथसाठी एक-एक साडी देते. शेवटी या व्हिडिओमध्ये (Karwa Chauth 2021 Video) या दोन्ही तरुणी एकमेकांसोबत पारंपरीक पध्दतीने करवा चौथ साजरा करतात. एकमेकींचे चेहरे चाळणीतून बघतात आणि पाणी देखील (Lesbian Couple celebrating Karwa Chauth) पाजतात. तेव्हा याठिकाणी उघड होते की या दोन तरुणी एकमेकींच्या पार्टनर आहेत. पाहा Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काहींनी ही जाहिरात प्रगतिशील असल्याचंही म्हटलं आहे. तर काहींनी यावर टीका केली आहे. Internet वर खळबळ काहींनी डाबरचं अशी जाहिरात केल्याबाबत कौतुक केलं आहे. तर काहीजण ही जाहिरात आणि Fem प्रोडक्ट्सना Boycott करण्याचीही मागणी करत आहेत. हिंदू सणांच्या बाबतीतच अशा जाहिराती का बनवल्या जातात असा सवाल काहींनी विचारला आहे. काहीनी अशाप्रकारच्या जाहिरातीना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: