वॉशिंग्टन, 18 जानेवारी : सामान्यपणे लहान मुलं झोपेत अंथरूणात लघवी करतात. पण काही वेळा काही कारणांमुळे मोठी माणसंही झोपेत लघवी करतात. असंच एका तरुणाने केलं. गर्लफ्रेंडसोबत एकाच बेडवर झोपलेला असताना त्याने झोपेतच अंथरूणात लघवी केली. त्याच्या या विचित्र कृत्यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने असं काही केलं की तिला पोलिसांनी अटक केली. नेमकं असं घडलं तरी काय?
अमेरिकेच्या लुइसियानातील हे विचित्र प्रकरण आहे. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार ईस्ट बॅटन रूज शेरिफच्या कार्यालतील अधिकाऱ्यांना शनिवारी एका स्थानिक रुग्णालयातून फोन आला. त्यानंतर ब्रियाना लॅकोस्ट नावाच्या 25 वर्षांच्या महिलेला अटक करण्यात आली. जिच्या बॉयफ्रेंडने झोपेत बेडवर लघवी केली होती. त्या रात्री दोघंही दारू प्यायले होते आणि नशेत होते.
हे वाचा - इंडियन तरुणासोबत लग्नासाठी सोडला देश, भारतात येताच इराणी तरुणीचा मृत्यू; धक्कादायक कारण
ज्या तरुणाने अंथरूणात लघवी केली. त्याने पोलिसांना सांगितलं की तो आपली 25 वर्षांची गर्लफ्रेंड ब्रियाना लॅकोस्टसह गेल्या दीड वर्षांपासून राहतो आहे. बेडवर लघवी केल्याने त्याच्या गर्लफ्रेंडला खूप राग आला. तिने त्याला झोपेतून उठवलं आणि जोरात मारू लागली. जेव्हा तो तिच्यापासून दूर पळू लागला तेव्हा तिने चाकूने त्याच्यावर हल्ला केला.
या व्यक्तीच्या शरीराच्या डाव्या बाजूला जखमा झाल्या आहेत. फुफ्फुसालाही हानी पोहोचली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्येच्या प्रकरणात म्हणून या महिलेला अटक झाली आहे.
हे वाचा - एअर इंडिया 'पी गेट' प्रकरणाला नवीन वळण; सहप्रवाश्यानं महिलेला भडकावल्याचा क्रूचा आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Crime, Viral, World news