चंदीगड, 15 जानेवारी : प्रेमाला कशाचीही सीमा नसते. अगदी दोन वेगवेगळ्या देशातील तरुण-तरुणींचं एकमेकांवर प्रेम जडलं आहे आणि त्यासाठी कित्येकांनी आपला देशही सोडला आहे. अशी कित्येक प्रेम प्रकरणं आहेत. अशाच एका इराणी तरुणीचा भारतातील तरुणावर जीव जडला. त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिने इराण सोडलं आणि ती भारतात आली. पण भारतात येताच लग्नाआधीच तिचा मृत्यू झाला आहे. हरयाणाच्या फरिदाबादमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
पलवल जिल्ह्यातील मितरौल गावातील तरुणाशी लग्न करण्यासाठी ईराणची नागरिक असलेली तरुणी भारतात आली. दिल्ली-आग्रा महामार्गावरील बामीनखेडातील मंसाग्रीन सोसायटीत ती राहत होती. पण ती राहत असलेल्या घरात बाथरूममध्ये तिचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंघोळ करण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. तिथं ती मृतावस्थेत सापडली. ती बाथरूममध्ये असल्याची माहिती मिळाली, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिला कसंबसं बाथरूममधून बाहेर काढून उपचारासाठी पलवलमध्ये आणण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला.
हे वाचा - नवरीने लग्नात बोलावले तिचे 5 एक्स बॉयफ्रेंड, पुढे जे घडलं.....
अमर उजालाच्या वृत्तानुसार बाथरूममध्ये अंघोळ करताना तिचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. बाथरूममध्ये गॅस गिझर होता. यामुळेच श्वास कोंडून ती बेशुद्ध झाली आणि नंतर तिचा जीव गेला. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला.
गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यायची?
गॅस गिझरमध्ये एलपीजीचा वापर होतो. गिझरमुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि नाइट्रो ऑक्साइड असे हानिकारक गॅस बनतात. या गॅसचं प्रमाण बाथरूममध्ये वाढल्यास लोक बेशुद्ध होतात. जास्त वेळ गिझर चालू राहिल्यास बंद बाथरूममध्ये श्वास कोंडतो आणि काही वेळात मृत्यू होतो. लवकरात लवकर उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
गॅस गिझर आणि सिलेंडेर दोन्ही बाथरूमच्या बाहेरच असावे. पाणी पाइपने बाथरूममच्या आत घेता येऊ शकतं.
बाथरूममचा दरवाजा बंद कऱण्याआधी बादलीत गरम पाणी भरून घ्या.
गिझर बंद केल्यानंतरच अंघोळ करा.
बाथरूममध्ये क्रॉस व्हेंटेलिशन असेल याची खबरदारी घ्या.
एक जण अंघोळ करून आल्यानंतर लगेच बाथरूममध्ये जाऊ नका, काही वेळ दरवाजा उघडा राहू द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.