कपल्स गार्डनमध्ये फिरण्यासाठी जातात. पण खास कपल्ससाठीच कोणतं गार्डन बनवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असं एक गार्डन आहे, जे फक्त कपलसाठी आहे आश्चर्य म्हणजे. इथं जाताच रोमान्स चढतो.
तुम्ही वेगवेगळ्या थीम्सवर आधारित गार्डन्स पाहिले असतील. ते त्या गार्डनचं आकर्षण असतं. या गार्डनमध्ये असं काही आहे की ज्यामुळे ते गार्डन रोमँटिक बनतं.
या गार्डनमध्ये मादक सुगंध पसरवणारी झाडं लावण्यात आली आहेत. तसंच अशा गोष्टी आहेत ज्या प्रणयाशी संबंधित आहेत. इथल्या वातावरणामुळे जो कुणी इथं येतो त्याला आपोआपच प्रेम आणि रोमान्स वाटू लागतो.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार फ्रान्समधील सोफी निटेल नावाच्या महिलेने हे गार्डन तयरा केलं आहे. ऍफ्रोडाइट गार्डन म्हणून ते ओळखलं जातं.
मानसिक आरोग्यासाठी प्रेम आणि जवळीक महत्त्वाची असते पण लोक ते विसरत आहेत, म्हणून खास कपलसाठी ही बाग तयार केल्याच सोफी सांगते. (सर्व फोटो प्रतीकात्मक- Canva)