नवी दिल्ली, 18 जुलै : अनेक वेळा आपण काही गोष्टी किंवा कृती मजेत करतो, त्याचे परिणाम किती घातक असू शकतात याचा विचारही ककत नाही. असंच एक धक्कादायक प्रकरण. ज्यात मुलाने मजेत एक टेस्ट केली. त्याचा रिझल्ट येताच त्याच्या आईवडिलांचा संसार मोडला. मुलाच्या टेस्टनंतर रिझल्ट पाहून त्याच्या आईवडिलांनी त्यांचं नातंच संपवलं. तशी मुलांवरून पालकांमध्ये भांडणं होतात. एक खूप लाड करतं, तर दुसरं खूप शिस्तप्रिय असतं. त्यामुळे एकाने मारलं तर दुसरं का मारलं म्हणून भांडतो किंवा मुलाला जवळ घेतो. असे पालक तुम्ही पाहिले असतील. कदाचित तुमचे पालकही असेच असतील. पण मुलाच्या टेस्टमुळे पालकांनी घटस्फोट घेणं हे थोडं विचित्र वाटेल. पण खरंतर मुलाने जी टेस्ट दिली ती साधीसुधी नाही. त्यामुळेच प्रकरण टोकापर्यंत पोहोचलं. असं सरप्राईझ कोण देतं! लेक 18 वर्षांचा होताच आईने बर्थडेला नको तेच केलं; मुलालाही वाटली लाज मिररच्या रिपोर्टनुसार, एका मुलाच्या मनात एक टेस्ट करण्याचा विचार आला. त्याने आई-वडिलांकडे याबाबत इच्छा व्यक्त केली. त्याच्या आईने त्याला स्पष्ट नकार दिला. पण त्याने वडिलांना कसंबसं तयार केलं. अखेर टेस्ट झाली. त्याचा परिणाम आला आणि त्यानंतर सर्वच उद्ध्वस्त झालं. त्याच्या आईवडिलांचा संसार मोडला. कारण त्याने जी टेस्ट केली ती डीएनए टेस्ट होती. या मुलाचे डीएनए त्याचे वडील आणि कोणत्याच नातेवाईकांशी जुळलं नाही. म्हणजे तो त्यांचा मुलगा नव्हताच. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला याबद्दल विचारलं तेव्हा तिनं तो दुसऱ्याचा मुलगा असल्याचं कबूल केलं. यामुळे आपली इतर दोन मुलंही आपली आहेत की नाही याचा संशय त्याच्या वडिलांना आला आणि प्रकरण टोकाला पोहोचलं. पैशासाठी मुलाचं किळसवाणं कृत्य, मेलेल्या आईच्या आवाजात बापाकडूनच लूटले 60 लाख मुलाने मजेत केलेल्या डीएनए टेस्टमुळे त्याच्या पालकांचं ३३ वर्षांचं लग्न मोडणार आहे. यामुळे मुलगाही नाराज झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.