नवी दिल्ली, 19 जानेवारी : त्या दोघांमध्ये कोणताही वाद नव्हता...मतभेद नव्हते आणि रागही नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून दोघंही आनंदात वैवाहिक जीवन जगत होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांसाठी सन्मान होता. मात्र एकेदिवशी अचानक पत्नी रात्री झोपेत बडबड करू लागली. (Mumbling in sleep) त्यानंतर 61 वर्षीय पती एंटोनीने (Antony) आपल्या 47 वर्षीय पत्नी रूथ फोर्टची (Ruth Fort) पोलिसात तक्रार केली. पोलीसदेखील पतीने पत्नीविरोधात केलेल्या तक्रारीनंतर हैराण झाले. मात्र जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनी पतीचं कौतुक केलं.
2010 मध्ये रूथ आणि एंटोनी यांचं लग्न झालं होतं. ते आनंदात होते. कुटुंबासमोर काही आर्थिक अडचणी आल्या होत्या. त्यावेळी रुथने केयर होम (Crystal Hall Care Home ) मध्ये नोकरी केली. तेथे एका अपंग महिलेच्या पैशांवर पत्नी मजा मस्ती करीत असल्याचं पाहून त्याला संशय आला होता, जो नंतर खरा ठरला.
झोपेत गुन्हा केला कबुल..
आपल्या पतीशेजारी झोपलेली असताना अचानक रूथ बडबडू लागली. (Mumbling in sleep) एंटोनीची झोप उडाली. थोडा वेळ बडबड केल्यानंतर रूथ असं काही म्हणाली, की त्याला धक्काच बसला. तिने केयर होममध्ये (Crystal Hall Care Home ) ज्या अपंग महिलेची जबाबदारी घेतली होती. तिला मार्केटमध्ये फिरवण्यादरम्यान तिचं एटीएम कार्ड चोरी केलं होतं. रूथने झोपेत हे सर्व कबुल केलं. ज्यानंतर एंटोनीने तिला जागं केलं. तिला सर्वकाही पुन्हा विचारलं. एंटोनीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा-VIDEO : TV डिबेटमध्ये बोलू दिलं नाही;Live असतानाच महिला पॅनलिस्टला वेड्याचे झटके
काही दिवसांपूर्वी दोघे कुटुंबासह मेक्सिकोला फिरायला गेले होते. येथे रूथने खूप पैसे उडवले. एंटोनीला पत्नीची ही वागणूक पाहून संशय आला. मात्र यावेळी रूथने काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर अचानक एका रात्री जमिनीवर पडलेल्या तिच्या पर्समध्ये काही कॅश आणि एक एटीएम कार्ड पाहून धक्का बसला. यानंतर रूथने झोपेत सर्व सत्य कबुल केलं. आपली पत्नी इतक्या निदयीपणे एका व्हिलचेअरवरील महिलेच्या पैशांचा दुरुपयोग केला. त्यामुळे त्याने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार केली. यावेळी कोर्टाने रूथला 16 महिन्यांची शिक्षा सुनावली (The judge praised Antony for reporting Ruth) आणि एंटोनीने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.