नवी दिल्ली, 19 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) बहुतेकांना आपल्या बुद्धीची चमक दाखवण्याची इच्छा असते. त्या नादात अनेकदा काही विचित्र गोष्टीही शेअर केल्या जातात. सोशल मीडियाचा ट्रेंड फॉलो करण्यासाठी अनेकदा सर्व मर्यांदा तोडल्या जातात. सध्या एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोक कंडोममध्ये रेड हॉट सॉस टाकून त्याचा वापर करीत आहेत. तज्ज्ञांनी याबाबत नागरिकांना मोलाचा सल्लाही दिला आहे. प्रेग्नेंन्सी थांबवण्यासाठी लोक कंडोममध्ये सॉस टाकणारा ट्रेंड फॉलो करीत आहेत. लाल तिखटाचा असा वापर अजिबात… याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, चुकूनही हे असले प्रयोग करू नका. कारण प्रायव्हेट पार्टवर लाल तिखटाची चटणी लावल्याने एक्सासायटमेंट कमी आणि वेदना जास्त होतात. यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, बेडरूममध्ये एक्सपेरिमेंटच्या नावाखाली खाण्या-पिण्याच्या वस्तुंचा वापर करणं सामान्य आहे, मात्र लाल तिखटाच्या चटणीचा वापर अजिबात करू नये. डॉक्टरांनी दिला हा हल्ला.. हॉट सॉसमधील केमिकल्समुळे जळजळ होऊ शकते आणि यामुळे वेदना होऊ शकते. पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तब्बल 4 हजार नर्व्स असतात आणि महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये याहून दुप्पट नर्व्स असतात. त्यामुळे तुम्हीच विचार करा की, लाल तिखटाने काय अवस्था होईल. हे ही वाचा- झोपेत बडबडू लागली पत्नी; असं काही म्हणाली की, पतीने थेट केला पोलिसांना फोन! अचानक झाला ट्रेंड.. सोशल मीडियावर या ट्रेंडबद्दल लिहिलं जात आहे. यात दावा केला जात आहे की, रेड सॉसमध्ये असे काही केमिकल्स असतात ज्यामुळे स्पर्म मरून जातात. आणि गर्भधारणा होत नाही. त्यामुळे नव्या पिढीतील अनेक जणं हा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र याचा परिणाम अत्यंत घातक ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.