Home /News /mumbai /

Mumbai: रुग्णालयात अल्पवयीन मुलीसोबत अनोळखी तरुणाचे अश्लील चाळे, आधी मिठी मारली मग...

Mumbai: रुग्णालयात अल्पवयीन मुलीसोबत अनोळखी तरुणाचे अश्लील चाळे, आधी मिठी मारली मग...

Crime in Mumbai: मुंबईतील एका रुग्णालयात आईच्या उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एका अनोळखी तरुणाने अश्लील चाळे (sexually molest) केले आहेत.

    मुंबई, 01 जानेवारी: गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात (Crime against woman and minor) प्रचंड वाढ झाली आहे. दररोज राज्यातील कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यातून अत्याचाराची अमानुष घटना उघडकीस येत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराचं सत्र सुरू असताना मुंबई (Mumbai) नजीक असणाऱ्या परळ याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका रुग्णालयात आईच्या उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एका अनोळखी तरुणाने अश्लील चाळे (minor girl sexually molest by unknown man) केले आहेत. संबंधित प्रकार रुग्णालयाच्या आवारात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण पीडित मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार ज्याठिकाणी घडला तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अद्याप आरोपीची ओळख पटली नाही. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत. हेही वाचा-पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत मोडलं लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईच्या उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात (KEM hospital paral) आली होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी पीडितेच्या आईवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पीडित मुलगी आपल्या आईला भेटण्यासाठी नेहमी रुग्णालयात ये-जा करते. दरम्यान घटनेच्या दिवशी गुरुवारी पीडित मुलगी मध्यरात्री ओपीडी क्रमांक 101 च्या मागील बाजूच्या ड्रेसिंग विभागाजवळ उभी होती. हेही वाचा-सख्खं नातंही विसरला नराधम; औरंगाबादेत अल्पवयीन बहिणीवर भावाकडून अत्याचार दरम्यान, त्याठिकाणी आलेल्या एका अज्ञात तरुणाने थेट पीडितेला मिठी मारली आहे. यानंतर आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करत तिच्याशी अश्लील शेरेबाजी केली. या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेनं आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत, वार्डच्या दिशेनं मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान आरोपीनं देखील घटनास्थळावरून पोबारा केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने भोईवाडा पोलीस ठाण्यात अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Sexual harassment

    पुढील बातम्या