जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तरुणाने गर्लफ्रेंडसाठी केलेलं ते काम पाहून नेटकरीही इम्प्रेस; VIDEO तुफान व्हायरल

तरुणाने गर्लफ्रेंडसाठी केलेलं ते काम पाहून नेटकरीही इम्प्रेस; VIDEO तुफान व्हायरल

तरुणाने गर्लफ्रेंडसाठी केलेलं ते काम पाहून नेटकरीही इम्प्रेस; VIDEO तुफान व्हायरल

हा तरुण दोन दगडांच्या मधून वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्यावर झोपतो. यानंतर त्याच्यासोबत असणारी तरुणी त्याच्या पाठीवर चढून हा झरा ओलांडते (Boy Made Human Bridge for Girlfriend).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात. तर काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका मुलाने आपल्या प्रेयसीसाठी असं काही केलं की या व्हिडिओने नेटकऱ्यांचं मनं जिंकलं. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. एकाच आईच्या पोटात वाढूनही जुळ्या बाळांनी 2 वेगवेगळ्या गर्भाशयातून घेतला जन्म व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण आणि तरुणी धबधब्याजवळून जात आहेत. व्हिडिओमध्ये झर्‍याचं पाणी डोंगराच्या मधून वाहताना दिसत आहे. यातील तरूण पुढेपुढे चालत आहे. तर, तरुणी त्याला फॉलो करत त्याच्या मागे जात आहे. इतक्यात हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही करतो, जे तुमचंही मन जिंकेल. हा तरुण दोन दगडांच्या मधून वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्यावर झोपतो. यानंतर त्याच्यासोबत असणारी तरुणी त्याच्या पाठीवर चढून हा झरा ओलांडते (Boy Made Human Bridge for Girlfriend). हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे.

जाहिरात

हा क्यूट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओवर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 3 लाख 74 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा आकडा सातत्याने वाढतच आहे. तर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. भल्यामोठ्या व्हेल माशाने बोटीजवळ घेतली उडी अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO हा व्हिडिओ पाहून सगळेच या तरुणाचं कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, आपल्या मैत्रिणीसाठी या तरुणाने जे काही केलं, ते अतिशय क्यूट आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, माझ्या भावाने अतिशय सुंदर काम केलं. तुझं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. तर आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, याला म्हणतात जेंटलमॅन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात