बंगळुरू 24 जुलै : एका तीन वर्षाच्या चिमुकल्यानं गणपतीची मूर्ती गिळल्यानंतर (Boy Swallows Ganesha Idol) त्याची प्रकृती गंभीर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकल्यानं सुमारे 5 सेंटीमीटर लांबीची गणेश मूर्ती गिळली (Boy Swallowed 5 Centimeters Long Lord Ganesha Idol) होती. नंतर प्रकृती बिघडल्यानं या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे उपचारानंतर मुलाला वाचवण्यात यश आलं. ही घटना कर्नाटकच्या बंगळुरु येथील आहे. मुलावर बंगळुरुच्या (Bengaluru) ओल्ड एअरपोर्ट रोडवरील मणिपाल रुग्णालयात उपचार केले गेले.
VIDEO: अरे हे काय! लग्नासाठीही सुट्टी नाही; मंडपातच नवरदेवाचं Work From Wedding
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या मुलानं खेळताना गणपती बाप्पाची छोटी मूर्ती गिळली. नंतर मुलाच्या छातीमध्ये दुखू लागलं तसंच त्याला लाळ गिळतानाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी छाती आणि गळ्याचा एक्स रे काढला असता मुलाच्या शरीरात गणपतीची मूर्ती असल्याचं दिसून आलं. यानंतर डॉक्टरांनी एंडोस्कोपीचा वापर करत ऑपरेशन करून त्याच्या शरीरातून ही मूर्ती बाहेर काढली. ऑपरेशननंतर काही तासातच त्याला डिस्चार्जही देण्यात आला.
किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी, नाशकातील VIDEO VIRAL
डॉक्टर श्रीकांत यांनी सांगितलं, की या मूर्तीमुळे मुलाच्या अन्ननलिकेला इजा झाली होती. तसंच त्याच्या छातीमध्येही दुखत होतं त्यामुळे त्याला गिळताना त्रास होत होता. डॉ. मनीष राय यांनी सांगितलं, की जेव्हा मुलाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र, तात्काळ उपचार मिळाल्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली आणि त्याला वाचवणं शक्य झालं. त्यांनी असाही सल्ला दिला, की लहान मुलांच्या पालकांनी सावध राहायला हवं आणि मुलांना अशा लहान गोष्टींपासून दूर ठेवायला हवं. विशेषतः अशा वस्तू ज्या लहान मुलं गिळून घेऊ शकतात .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bengaluru, Operation, Viral news