मराठी बातम्या /बातम्या /nashik /शुल्लक कारणावरून नाशकातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी; VIDEO VIRAL

शुल्लक कारणावरून नाशकातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी; VIDEO VIRAL

Freestyle fight in Nashik residential society video viral: नाशिकमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Freestyle fight in Nashik residential society video viral: नाशिकमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Freestyle fight in Nashik residential society video viral: नाशिकमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

नाशिक, 24 जुलै : नाशिक शहरातील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Nashik Video Viral) होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत सोसायटीतील रहिवाशांत किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी (Freestyle fight among residents of society) झाल्याचं पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नाशिकमधील सिडको (CIDCO Nashik) भागातील एका रहिवाशी सोसायटीमधील असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील सिडको भागातील एका सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या घटनेत महिलांना देखील मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. किरोकोळ कारणावरून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सोसायटी चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मारहाण केल्याचा आरोप सोसायटीतील महिलेने केला आहे.

या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत घडला होता असाच प्रकार

इमारतीमधील रहिवाशांत किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. डोंबिवलीतील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चार जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरात भांडणाचं एक धक्कादायक प्रकार समोर आले. साई इन्कल्यू या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली. दुसऱ्या एका महिलेने या मुद्द्यावर त्या महिलेशी वाद घातला. ज्या महिलेचा कुत्रा होता तिने साफसफाई केली नंतर हा वाद वाढला.

First published:

Tags: Nashik, Viral video.