जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रोमँटिक डेट सुरु असतानाच आली अनोळखी व्यक्ती, महिलेचा चेहऱ्याचा उडाला रंग

रोमँटिक डेट सुरु असतानाच आली अनोळखी व्यक्ती, महिलेचा चेहऱ्याचा उडाला रंग

रोमँटिक डेट सुरु असतानाच आली अनोळखी व्यक्ती, महिलेचा चेहऱ्याचा उडाला रंग

ते दोघं डेट करत होते. रोमँटिक गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात आक्रित घडलं. एक अनोळखी व्यक्ती टेबलवर येऊन बसली आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

बॉस्टन, 26 डिसेंबर: एका तरुणाची महिलेसोबत डेटिंग (date with woman) सुरू असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती (strange person) टेबलवर येऊन बसली आणि सगळेच अवघडून गेले. सध्या डेटिंगचा जमाना आहे. अनेक तरुण आणि तरुणी ऑनलाईन डेटिंग साईटवर (online dating site) भेटतात, ओळख होते, जुजबी गप्पा होतात आणि नंतर दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटण्याचा निर्णय घेतात. अशाच प्रकारे एका तरुणीसोबत डेटसाठी भेटलेल्या तरुणाने त्याला आलेला भयंकर अनुभव शेअर केला आहे.   रोमँटिक डेट होती सुरू अमेरिकेतील बोस्टनमध्ये राहणाऱ्या तरुणाची एका डेटिंग ऍपवर ओळख झाली. दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. तारीख ठरली, ठिकाण ठरलं. दोघंही एकमेकांना ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी भेटले. गप्पा सुरू झाल्या. हळूहळू गप्पा रंगत गेल्या आणि डेट रोमँटिक होऊ लागली. दोघांनाही या डेटवर मजा येत होती. ड्रिंक्स आणि जेवण संपवून दोघांनीही सिनेमा पाहायला जाण्याचा बेत केला होता. मात्र तेवढ्यात एक विचित्र घटना घडली.   अनोळखी पुरुष बसला टेबलवर   दोघांच्याही रोमँटिक गप्पा रंगात आल्या असताना अचानक एक अनोळखी पुरुष त्यांच्या टेबलवर येऊन बसला. त्याला पाहून महिलेच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हा पुरुष नेमका कोण आहे, हे आपल्याला कळत नव्हतं. न राहवून आपण त्या व्यक्तीला त्याची ओळख विचारली. त्यावर आपण या महिलेचा पती असल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकून तरुणाला काय करावं, तेच कळेना.   हे वाचा -

लग्न होतं जुनं तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर लग्नाला 7 वर्षं झाल्याचं त्यानं सांगितलं. तरुण त्याला बसलेला धक्का पचवत असतानाच आणखी एक घटना घडली. टेबलपासून काही अंतरावर उभी असणारी एक लहान मुलगी आई, आई असं ओरडत टेबलकडे धावत आली. ते पाहून तरुण इतका घाबरला की त्याने डेट सोडून सरळ तिथून पळ काढला. शेअर केला अनुभव तरुणाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात